भंडारा (Youth Death) : बालाघाट जिल्ह्यातील रामपायली तालुक्यातून वाहणार्या वैनगंगा नदीत ३ तरुण बुडाल्याची घटना मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी घडली. यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील (Youth Death) एका तरुणाचाही समावेश आहे.
मोहित महेश बुर्डे (२०) रा. बेनी जि. बालाघाट, अखिल चमनलाल बुर्डे(२१) रा. बेनी, जि. बालाघाट आणि राकेश नंदनवार रा. तुमसर जि. भंडारा हे तिघेही तरुण रामपायली तालुक्यातील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत अखिलचे वडील चमनलाल बुर्डे देखील नदीकाठी उपस्थित होते. आंघोळ करत असतांना, तिन्ही (Youth Death) तरुण नदीच्या खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले.
हे पाहून अखिलचे वडील चमनलाल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिन्ही तरुणांपैकी कोणालाही वाचवता आले नाही आणि ते तिघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बालाघाट जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली. मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी अंधार झाला असल्याने तरुणांचा काहीही शोध लागला नाही.




