खंडाळा येथील घटना, २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान
समुद्रपूर (Lightning bulls Died) : तालुक्यात शुक्रवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी खंडाळा येथे शेतामध्ये चरत, असलेल्या तीन बैलांवर वीज पडून तिन्ही बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे शेतकर्याचे जवळपास २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी संदीप दिनकर झाडे यांचे खंडाळा शिवारात शेतामध्ये तिन बैल चरत होते. यावेळी अचानक विजेच्या कडकडासह सुरू झालेल्या जोरदार पावसात चरत असलेल्या तिन्ही बैलावर विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. संदीप झाडे यांनी मागल्यावर्षीच १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बैलजोडी व १ लाख रुपये किमतीचा १ बैल खरेदी केला होता.
वडिलांच्या नावे स्वताची ३ एक शेती असून ते गावातील इत्तर शेती किरायाने करुन यातून येणार्या उत्पादनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. या (Lightning bulls Died) घटनेने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कपिल हाटकर यांनी तलाठी गजानन ठाकरे यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या तर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी अरुण तुराळे यांनी शवविच्छेदन केले आहे.




 
			 
		

