औंढा नागनाथ (Hingoli) :- शहरात चोरट्यांनी 27 मार्च गुरुवारच्या एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना केल्या असून यामध्ये शहरातील नागेश्वरा कॉम्प्लेक्स मधील पवन शिंदे यांच्या एसबीआय बँक (SBI Bank) ग्राहक सेवा केंद्र दुकानाचे सेटर वाकवून दुकाना मध्ये प्रवेश करत गल्ल्यातील नगदी 90 हजार रुपये व इतर साहित्य चोरले.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तसेच बाजूला असलेल्या सतीश गव्हाणे यांच्या अयोध्या मोबाईल शॉपी मधून देखील नवे मोबाईल आणि इतर मोबाईल असा साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरटे एवढ्यातच थांबले नसून त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा नागेश्वर नगराकडे वळवून नागेश्वर नगर भागातील सोनूणे यांची दुचाकी चोरली दरम्यान एसबीआय ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानात चोरी करताना दिनांक 28 मार्च शुक्रवार रोजी पहाटे तीन वाजून 44 मिनिटाला चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस राहीरे जमादार वसीम पठाण माधव सूर्यवंशी ज्ञानेश्वर गोरे अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यानंतर सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास ठसेतज्ञ पथक व स्वान पथक दाखल झाले यानंतर श्वानाने कॉम्प्लेक्स पाठीमागील भागात मार्ग दाखवला. चोरट्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



 
		

