हिंगोली (Hingoli) :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने तपास चक्र फिरवून तिघांना जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून सहा चोरीच्या मोटरसायकल जप्त केल्या.
तिघांना जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून सहा चोरीच्या मोटरसायकल जप्त
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मागील काही दिवसापासून हिंगोली शहरासह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्यात त्या अनुषंगाने चोरीचे गुन्हे(Crime) उघड करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकातील अशोक धामणे धनंजय क्षीरसागर गणेश लेकुळे गणेश वाबळे संतोष करे अजहर पठाण यांचे पथक मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत होते त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे नरसी नामदेव येथील शेख दस्तगीर शेख मोबीन, मयूर पांडुरंग कोल्हे, वैभव राजू पायघन राहणार नरसी नामदेव या तिघांना तपासाबाबत बोलावून विचारपूस केली असता त्यांनी काही ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सेनगाव टी पॉईंट येथून चोरी केलेल्या सहा मोटरसायकल 4 लाख 93 हजार रुपयांच्या या तीन चोरट्यांकडून जप्त
ज्यामध्ये हिंगोली शहरा जवळील जे.के महाविद्यालय तसेच सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय कोळसा यात्रा आणि सेनगाव टी पॉईंट येथून चोरी केलेल्या सहा मोटरसायकल 4 लाख 93 हजार रुपयांच्या या तीन चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये हिंगोली ग्रामीण व सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील पाच मोटरसायकल त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने मोटरसायकल चोरट्यांचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. या तीन चोरट्यांकडून आणखी मोटरसायकल (Bikes)चोरीच्या काही घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.