भिवापूर (tiger attack) : तेंदूपत्ता संकलनाकरीता जगंलात गेलेल्या मजूरावर वाघाने हल्ला (tiger attack) करून ठार केल्याची घटना आज सकाळच्या 10 वाजताच्या सूमारास घडली. कल्पना चौधरी रा. भिवगड, त. उमरेड असे मृत महिलेचे (woman death) नाव असून गावाशेजारील जगंलात तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना, अचानक वाघाने तिच्यावर झडप घालून ठार केले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
प्राप्त माहितीनुसार, कल्पना ही सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली होती. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला.तिने स्वतः चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतू वाघापुढे ती हतबल झाली. (tiger attack) वाघाने तिच्या नरडीचा घोट घेवुन तिला ठार केले. विशेष म्हणजे परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून, महालगाव परिसरात शेतात बांधून ठेवलेल्या एका शेतकऱ्याचा एक बैल व दोन गायींना नुकतेच ठार केल्याची घडली होती. जनावरांना व मानवावर वाघ सतत हल्ला करीत असल्याने, (Forest Department) वनविभागाने त्वरीत या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.