बुद्ध पौर्णिमानिमित्त प्राणिगणना उपक्रम; निसर्गप्रेमींचा उत्साहात सहभाग
चंद्रपूर (Todaba Tiger Reserve) : येथील जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये ११ वनपरिक्षेत्रामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना पार पडली. कोअर व बफर झोन मध्ये ६३ वाघ, १३ बिबट तर ९३ अस्वल आढळून आली. दोन्ही ठिकाणी ५५०२ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे (Todaba Tiger Reserve) दोन्ही झोनमध्ये वाघांची संख्या ८ ने वाढली तर बिबटची संख्या ४ ने घटली आहे.
परंपरागत काळापासून बुध्द पौर्णिमेच्या रात्री करण्यात होत असलेल्या ताडोबाच्या कोअर झोनमध्ये ५ वनपरिक्षेत्रात ९६ मचाणी तर बफर झोनमध्ये ६ वनपरिक्षेत्रात ८१ मचाणी उभारण्यात आलेल्या होत्या. (Todaba Tiger Reserve) बफरमध्ये राज्यभरातील १६२ पर्यटनप्रेमींनी चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. कोअर झोनमध्ये वनाधिकार व क्षेत्रीय वन कर्मचार्यांनी प्राणी गणना केली. कोअर व बफर क्षेत्र मिळून ६३ वाघ, १३ बिबट, ९६ रानकुत्रे, ९३ अस्वल, १७३७ चितळ, ५५३ सांबर, ५८२ रानगवे आणि मांसभक्षी व तृणभक्षी असे एकूण एकूण ५ हजार ५०२ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.
मागील वर्षी कोअर व बफर मध्ये फक्त ५५ वाघ आढळून आले होते. तर बिबट्याची संख्या १७ होती. कोअर झोनमध्ये ३९ वाघ, ९ बिबट, ८६ रानकुत्रे, ५० अस्वल, ३०० रानगवे, १२४९ चितळ, ३८५ सांबर आणि मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वाघांची संख्या ८ ने वाढली मर बिबट संख्या ४ ने घटली हे विशेष. मागील काही महिण्यापासून अवकाळीमुळे ताडोबातील नैसर्गीक स्त्रोतामध्ये पाणी साठून असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाणी टंचाई भासली नाही. (Todaba Tiger Reserve) पाणवठ्यावरूनही वन्यप्राण्यांची तहान भागत असल्याचे चित्र ताडोबात पाहायला मिळत असतानाच पाणवठे व नैसर्गीक स्त्रोतावर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने समाधान कारक नोंदी करण्यात आल्या.
६३ वाघ, १३ बिबट, ९३ अस्वलसह ५ हजार ५०२ वन्यप्राण्यांची नोंद
यावेळी ८ ने वाघाची संख्या वाढली आहे. बिबट १३ आढळून आले असून यावेळी ४ ने संख्या कमी झाली आहे. अस्वलाची संख्या तब्ब्ल ३२ झाली असून मागील वर्षीपेक्षा अस्वलांच्या संख्येत २८ ने वाढ झाली आहे. तृणभक्ष्यी प्राण्यांमध्ये भेडकी ९८, चितळ १७३७, सांबर ५५३, चौसिंगा २७, निलगाय ८७, रानगवा ५८२,वानर ८५७, रानडुक्कर ३८१, रानकुत्रा ९६, सायळ २७, मुंगूस १०० आढळून आले. मांजर प्रकारामध्ये जवादी मांजर २९, उदमांजर ५०, रानमांजर ७ व इतर वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. (Todaba Tiger Reserve) विषेश म्हणजे यावेळी मोरांच्या ५५१ नोंदी घेण्यात आल्या आहेत. पर्यटन प्रेमींना मोरांना जवळून पाहता आले. मोरांची ५५१ संख्या आढळून आली. चिकारा, कोल्हे व तडसाची नोंद आहे.