भाजपाच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य तिरंगा यात्रा!
औंढा नागनाथ (Tiranga Rally) : ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैनिकांनी (Indian Soldiers) केलेल्या वीरतेबाबत त्यांच्या सन्मानार्थ दिनांक 27 मे मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता औंढा नागनाथ शहरातील नगरपंचायत येथून समस्त देशभक्त (Patriot) व भाजपाच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य तिरंगा यात्रा (Tiranga Rally) काढण्यात आली होती.
देशप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी!
सुरुवात नगरपंचायत (Nagar Panchayat) येथून करून मेन मार्केट डॉक्टर हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, मंदिर कमान मार्गे काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashloka Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप करण्यात आला.तिरंगा यात्रेत भाजपा जिल्हा अध्यक्ष गजाननराव घुगे, ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, तेजकुमार झांजरी, भाजपा ओबीसी प्रदेश सचिव शरद पाटील, ओबीसी परदेश उपाध्यक्ष शशीकांत वडकूते, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष सर्जेराव दिंडे, शहराध्यक्ष बबन सोनुणे, विलास काळे, अंकूश आहेर, एडवोकेट शेषराव कदम, युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य एडवोकेट गणेश ठाकूर, नगरसेविका अश्विनी पाटील, मंगलाताई कुटे, सखाराम इंगळे, युवा नेते राजूगिरी महाराज, गणेश पाटील, गजानन कुटे डिगांबर गिरी, शंकर गोरे, नवनाथ देशमुख, प्रकाश पोले विलास हुडेकर, डॉ लक्ष्मण लोखंडे, श्रीरंग हनवते यांच्यासह देशप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.