Mahagaon crime :- तालुक्यातील दहिसावळी येथे कर्जाला कंटाळून युवा शेतकर्यानी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide)केल्याची घटना काल दि. २१ सप्टेंबर रोजी घडली. विपुल विश्वंभर घोरपडे (२५) असे मृत्यू (Dead)झालेल्या युवा शेतकर्याचे नाव आहे.
तालुक्यातील दहिसावळी येथील घटना
दहिसावळी येथील युवा शेतकरी विपुल विश्वंभर घोरपडे (२५) या युवा शेतकर्याकडे विविध बँकेचे कर्ज होते. व पावसाळ्यामुळे सर्व शेती खरडून गेली, शेतातील संपूर्ण पिके जमीन दोस्त झाली. सर्व हातातून निघून गेलं आता कर्ज फेडायचे कसे ? या विवांचनेत येवून युवा शेतकर्यानी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गावातील नागरिकांनी ही घटना पोलीस स्टेशनला कळवताच बीट जमादार केशव चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाला शवविच्छेदनासाठी (Autopsy) सवना येथे पाठवण्यात आले. वृत्तलेपर्यंत पुढील माहिती कळू शकली नाही. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशन ठाणेदार च्या मार्गदर्शनात बीट जमादार केशव चव्हाण करीत आहेत.