बार्शीटाकळी (Ganapati Festival) : डीजे सारख्या कर्णकर्कश आवाज असलेल्या आधुनिक वाद्याचा गणेशोत्सव मिरवणुकीत वापर करू नये. ते जनतेच्या हिताचे नसून पारंपारिक वाद्य हिच गणपतीची (Ganapati Festival) ओळख आहे. असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे (SDPO Vaishali Mule) यांनी शांतता समितीच्या सभेत व्यक्त केले.
बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या सभागृहात शांतता समितीची सभा आयोजित सोमवार दिनांक 25 ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास आयोजित केली होती. सदर सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, निवासी तहसीलदार अतुल सोनोने, नायब तहसीलदार नागे, बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ, नगरपंचायत चे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, वीज वितरण कंपनीचे उप अभियंता उल्हास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास गोसावी, पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे, उपस्थित होते.
बार्शीटाकळी येथील शांतता समितीच्या व विविध पक्षाच्या पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बार्शीटाकळी हे एकतेचे प्रतिक आहे. या गावात पूर्वीपासूनच हिंदू मुस्लिम दलित असे विविध समाजाचे नागरिक एकत्रितपणे सण व (Ganapati Festival) विविध धार्मिक उत्सव शांततेत पार पाडतात. असे अनेक व त्यांनी आवर्जून सांगितले. पुढे बोलताना मुळे म्हणाल्या की, सोशल मीडिया वर आक्षेपार्य मजकूर कोणीही टाकू नये, दारू पिऊन तसेच ध्वनी प्रदूषण होईल असे कृत्य कोणी करू नये.
गणेशोत्सव व ईद महोत्सव आनंदात व शांततेत पार पाडावा. शासनाने जाहीर केलेल्या पुरस्कार योजनेत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवून आपल्या तालुक्याचे नाव उज्वल करावे. असे यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील पोलीस पाटील, विविध वृत्तपत्राचे व सोशल मीडियाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.