आरोपींना 22 पर्यत पिसीआर!
पांढरकवडा (Transaction Case) : केळापुर तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थी व सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोहयोचे काम देतो म्हणुन दोन भामट्यांनी सुमारे 27 विद्यार्थी व युवकांचे पांढरकवडा येथील महाराष्ट्र बॅकेत खाते उघडुन त्यातुन लाखो,करोडोचे व्यवहार केले होते. या प्रकरणी पांढरकवडा पोलीसांनी श्रीकांत कर्लावार याच्या फिर्यादी वरुन मयुर राजेश चव्हाण 23 रा चोपन, मनोहर राठोड 45 रा जरंग तालुका घाटंजी यांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असल्याने त्याचा तपास एलसिबीकडे देण्यात आला होता. एलसिबीचे एपीआय दत्ता पेंडकर व पथकाने या प्रकरणातील चार आरोपींना काल 17 रोजी रात्री उशिरा विविध गावातुन अटक केली आहे. त्या चारही जणांना आज 18 रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 22 पर्यत पिसिआर सुनावला आहे. मयुर राजु चव्हाण 23 रा चोपन, उमेश अनिल आडे 31 रा वसंतनगर, निखिल यादव खैरे 30 रा उमरी रोड, अलताफ मोहम्मद अनिस अकबाणी 23 रा तुकंदम तलाव चंद्रपुर असे पिसीआर सुनावलेल्या आरोपींची नावे आहे.
विधानसभेत सुध्दा याचे पडसाद उमटले!
युवकांची बनावट बॅक खाते काढुन त्यातुन अवैद्य मार्गाने क्रीकेट सट्ट्याच्या पैशाची हेराफेरी करण्यात आली होती. सदर प्रकरण हे क्रीकेट सट्ट्याचे असतांना त्यास रोहयोकडे वळविण्याचा काहींना प्रयत्न केला होता. त्याचा उलगडा वृत्ताच्या माध्यमातुन देशोन्नतीने 10 जुलै रोजीच्या अंकात केला होता. त्यानंतर विधानसभेत सुध्दा याचे पडसाद उमटले होते. तेव्हा पोलीसांनी श्रीकांत कर्लावार रा वाघोली याच्या फिर्यादी वरुन मयुर चव्हाण व मनोहर राठोड यांच्या विरुध्द विविध कलमान्यवे गुन्हे दाखल (Crimes Filed) केले होते. विशेष म्हणजे हे गुन्हे दाखल होण्याआधीच काही पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी सटोडीयांच्या सांगण्यावरुन बॅकेत खाते काढण्यात आलेल्या काही युवकांना (Youth) ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन पैसे वसुली करण्याकरीता त्यांना धाकदपट केली होती. तशी तक्रार सुध्दा त्या युवकांनी पांढरकवडा पोलीसात (Pandharkawada Police) केलेली आहे. गुन्हे वगैरे दाखल नसतांना सुध्दा पोलीसांनी कोणत्या कारणाने त्या युवकांना चौकशीकरीता ताब्यात घेतले. याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असुन पांढरकवडा येथील सटोडीयांचा सुध्दा यामध्ये समावेश आहे का?. त्या दृष्टीने सुध्दा एलसिबिने तपास करण्याची आवशक्ता आहे. पांढरकवडा येथील काही सटोडीयांची नागपुर, वरोरा, भद्रावती,चंद्रपुर येथे सुध्दा खायवाडी सुरु असते. मागिल वर्षी आयपीएलच्या हंगामामध्ये पांढरकवडा व करंजी रोड येथील तिन सटोडीयावर नागपुर पोलीसांनी कार्यवाही (Proceedings) केली होती. त्यातील आरोपींचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे का? याचा सुध्दा तपास एलसिबिच्या पथकाने करावा. अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकातुन करण्यात येत आहे. कारण शहरातील अनेक युवक क्रीकेट सट्टयात (Cricket Betting) बरबाद झालेले आहे. बुकी मात्र आर्थीक दृष्ट्या गब्बर बनत चालले आहे.