Chandrapur :- महाराष्ट्रातील आदिवासीच्या (Adivasi) आरक्षणामध्ये बंजारा अथवा कोणत्याही जातीचा समावेश करु नये, या मुख्य मागणीसह अन्य मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिवती तालुक्यातील आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती व तालुक्यातील विविध आदिवासी सामाजिक संघटनेचे नेतृत्व दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता वीर बापूराव शेडमाके चौक पासून तहसील कार्यालयसमोर जंगोम एल्गार महामोर्चा काढण्यात आला.
सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणले, तालुक्यातील हजारो आदिवासीचा सहभाग
मराठा समाजाच्या (Maratha Community) मुंबई आंदोलनादरम्यान सकल मराठा बांधवांसाठी हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर (१९२०) लागू करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. याच धर्तीवर, बंजारा व इतर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आदिवासी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदिवासीचे घटनात्मक आरक्षण कायम ठेवावे आणि महाराष्ट्रातील आदिवासी (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये बंजारा अथवा इतर कोणताही जाती समूहाला समाविष्ठ करण्यात येऊ नये या मागणी करिता तालुक्यातील गाव पाटील यांचे नेतृत्वाने जंगोम जन आक्रोश मोर्चा काढत आक्रोश व्यक्त करत आहे.
यावेळी मोर्चात भोजू पा. आत्राम, सत्तरशाह पा. कोटनाके, भिमराव मेश्राम, बाजीराव वलका, शामराव गेडाम, भिमराव पा. जुमनाके, नामदेव जुमानके, प्रभाकर उईके, मारू पा. नैताम, शंकर वेट्टी, झाडू कोडापे, सोनेराव पेंदोर, हनुमंत कुमरे, गोविंदराव कुमरे, तुकाराम धुर्वे, सोमाजी सिडाम, चैनराव मडावी, आनंदराव शेडमाके, लचू मडावी, आनंदराव मडावी, सुरेश कोडापे आदी सहभागी झाले होते.कृती समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम यांनी प्रास्ताविक केले संचालन कृती समितीचे सचिव कंटु कोटनाके यांनी तर आभार :- कोषध्यक्ष सिताराम मडावी (सरपंच पाटण) यांनी आभार मानले.