हिंगोली (Shri Vighnaharta Chintamani) : शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाच्या दर्शनानिमित्त आलेल्या भाविकांसह इतर अनेक सामाजिक संघटनांनी जी सेवा केली. त्याबद्दल संस्थानच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
श्री गणेश उत्सवात श्री विघ्नहर्ता चिंतामणी (Shri Vighnaharta Chintamani) गणपती बाप्पाच्या दर्शनाकरीता दहा दिवसात लाखो भाविकांची गर्दी झाली होती. विशेष करून अनंत चतुथदर्शी निमित्ताने आलेल्या लाखो भाविकांच्या व्यवस्थे करीता अनेक सामाजिक संघटना व बाप्पांच्या भाविकांनी अंग झोकून घेतले होते. त्यामुळे या सर्वांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थानच्या वतीने या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी अनेक सामाजिक संघटनासह गणेश भक्तांना स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. ज्यामध्ये ओम साई, गणेश मंडळ, मारवाडी गल्ली (खिचडी, चाय, काँफी, पाणी बाँटल), चिंतामणी सेवेकरी मित्र मंडळ भोईपुरा,श्री एम्पोरियम, मेडिकल लाईन (अंकित अग्रवाल), विजय आप्पा सराफ मेडीकल लाईन, एकदंत बाल गणेश मंडळ, मेडीकल लाईन, गिरीष मेडिकल (गिरीष गुडेवार), प्रभुदास रायचंद, महावीर चौक (मिसळ), राम राज्य मित्र मंडक, गांधीचौक (खिचडी), चितामणी ग्रुप (चहा, पाणी), गवळीपुरा नवयुवक संघ, विश्वकर्मा गणेश मंडळ, आरामशीन (खिचडी), विजय गव्हाणकर, कालभैरव गणेश मंडल (खिचडी),अनिल खांडल (चहा पाणी), सदाशिव आप्पा सराफ (पुरी भाजी), श्रीमान श्रीमती (आलु वडा,) जय श्रीराम मित्र मंडल (महाप्रसाद), आदर्श मित्र बाल गणेश मंडल (मिरची भजे ), अरुण चोंढेकर, विघ्नहर्ता ग्रुप (चहा बिस्कीट), खटकाळी हनुमान मंदीर (स्वच्छता अभियान), ऑटो संघटना, त्रिशुल नवदुर्गा (चपल स्टँड) हिंगोलीचा राजा गणेश मंडळ मुन्नासेठ बंगाडीया (चहा), बादल पेरिया, बलराम कुरील (आलुवडा), आर्यवेश्य समाज ( चहा), दिनेश बासटवार, विजय डहाळे (उसळ), दिपक डहाळे, आशिष घन (पूरी भाजी), पिंटू वर्मा ( मूरमुरा चिवडा), पंकज पुरी, शिवाजीराव तानाजीराव मुटकुळे, कैलास मेडिकल, राजस्थानी मारवाडी युवा संघटना जिल्हा हिंगोली, श्री विघ्नहर्ता चिंतामणी ग्रुप (खिचडी, चहा), आमदार संतोष बांगर मित्र मंडळ तर्फे निलेश बांगर, गणेश दराडे ( साबुदाणा खिचडी, केळी) यांच्यासह अनेक भाविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैभव पांडे तर आभार प्रदर्शन दिलीप बांगर यांनी केले.
यावेळी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ व पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांनी बोलताना (Shri Vighnaharta Chintamani) श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाचे आतापर्यंत केवळ नाव ऐकून होते. परंतु आता प्रत्यक्षात या गणपती बाप्पाची ख्याती किती सर्वदूर प्रसिध्द याची प्रचितीच गणेश उत्सवात दिसून आली. लाखोंच्या संख्येने भाविक आले असताना त्यांच्या सेवेसाठी संपुर्ण हिंगोलीकर कशापध्दतीने धावून आले याचे अनेक उदाहरण उपस्थित मान्यवरांनी देवून गणेश भक्तांचे कौतुक केले. त्यातच या गणेश उत्सव दरम्यान ईद -ए- मिलादुन्नबी हा मुस्लीम बांधवाचा सण आला असताना त्यांनी यादरम्यान कुठेही मिरवणुका न काढता गणेश उत्सव झाल्यानंतर मिरवणुका काढण्याचा निर्णय घेवून हिंदू-मुस्लीम बंधूभाव जोपासल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती होती.