कन्हान (Pahalgam Terrorist Attack) : सकल हिंदु समाज (Sakal Hindu Samaj) कन्हान शहर व्दारे तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे जम्मु-काश्मीर मधिल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करून हल्यात मृत्यु झालेल्या पर्यटकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंगळवार (दि.२२) एप्रिल रोजी जम्मु- कश्मीर मधिल पहलगाम येथे पर्यटक स्थळावर दहशतवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला. या (Pahalgam Terrorist Attack) हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा मृत्यु झाला. तर अनेक नागरिक जख्मी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असुन विविध संघटने द्वारे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवार (दि.२४) एप्रिल ला सकल हिंदु समाज (Sakal Hindu Samaj) कन्हान शहर व्दारे तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे निषेध आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.
कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित शक्ति ट्रांसपोर्ट चे मालक छोटु भैया यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन मिनटाचा मौन पाळुन दहशतवादी हल्ल्यात मृत्यु झालेल्या पर्यटकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्र शासनाने दहशतवाद्यांचा विरोधात तात्काळ कठोर पाऊल उचलावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
याप्रसंगी सकल हिंदु समाज (Sakal Hindu Samaj) कन्हान शहराध्यक्ष शुभम बावनकर, शक्ति ट्रांसपोर्ट चे मालक छोटु भैया, ऋषभ बावनकर, सुजित सावरकर, अनिकेत निमजे, अजय पाली, अरुण कश्यप, अमन गुप्ता, दिनेश बरमैया, रेहान लोंढे, सुहान भाई, उदय माहोरे, आकाश गुप्ता, लोकेश दमाहे, आनंद शर्मा, योगेश चकोले, नारायण गजभिये, आदित्य जयपुरकर सह नागरिक उपस्थित होते.




