हिंगोली (Trisharan Panchsheel) : तथागत गौतम बुद्धांनी सर्वांना गौतम बुद्धाचा धम्म दिला आहे. या पृथ्वीतलावर अनंत प्रकारे दुःख पसरले असून या दुःखातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्रिशरण पंचशील आचरणात आणणे आवश्यक असल्याचे दिल्ली येथील भंते करुणाबोधी महाथेरो यांनी रविवारी हिंगोली येथील शिवलीला सभागृहात घेण्यात आलेल्या महा -उपोसथ धम्म दिवसानिमित्त कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले.

हिंगोली येथे मागील वर्षापासून सुरू करण्यात आलेले महा-उपोसथ धम्मदिवसानिमित्त शहरातील तरुण संयोजन समितीने 31 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या (Trisharan Panchsheel) महाउपोसथ धम्म दिवसाचे हे दुसरे वर्ष असून ३१ ऑगस्ट सकाळी ६.ते सायंकाळी ६ पर्यंत शिवलीला लॉन्स,अकोला बायपास रोड, हिंगोली येथे एक दिवसीय महा-उपोसथ धम्म दिनाचे आयोजन पूज्य भन्ते करुणाबोधी थेरो, दिल्ली व हिंगोली शहरातील पूज्य भन्ते पय्यावर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी उपोसथ म्हणजे काय ? यावर बोलताना सांगितले की, भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्मानुसार उपोसथाचे पालन जे करतात तेच खरे उपासक उपासिका होत. धम्मामध्ये उपोसथाला खूप महत्व आहे, तर उपोसथ म्हणजे नेमके काय असावे, तर वर्षावासाच्या कालावधीत महिन्यातून केवळ चार दिवस म्हणजेच दोन अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या अश्या चारही दिवस आपण अष्टशील धारण करून त्याचे नियमाप्रमाणे काटेकोर पालन करणे म्हणजेच उपोसथ.
पण आजच्या या धावपळीच्या जीवनात आम्ही धम्मापासुन बरेच दूर होत आहोत हे निदर्शनास येते, म्हणूनच धम्माशी निगडित राहण्यासाठी, उपोसथाला मूळरूपी जाणून घेण्यासाठी व आपल्या पुण्य पारमिताना पूर्ण करण्यासाठी आम्ही पुनः एकदा एक धम्म रूपी प्रयत्न म्हणून एक दिवसीय महा-उपोसथ धम्म दिवस (वर्ष दुसरे) आपल्या सर्वांकरिता आयोजित करण्यात आला आहे.यावेळी अष्ठशीलचे महत्व बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे असून त्याचे ग्रहण व आचरण केल्यास मानवाच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून येऊन सुखी जीवनाचा मंत्र यावेळी दिल्लीचे भन्ते करुणाबोधी महाथेरो यांनी या धम्म प्रवचनामधून विविध अष्टपैलू समजावून सांगत प्रश्न उत्तराचा तासही घेण्यात आला.
यावेळी पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि,अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि,) अब्रम्हचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि,, सुरामेरसयज्ञ्ज पमादड्डाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि, विकालभोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि, नच-गीत-वादित-विसुक-दस्सन, माला,गंध-विलेपान-धारण-मंडन-विभुसनठाणा,उच्चासयन-महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामि, या अष्टशिलाचे पालन करण्याचे आव्हान दिल्ली येथील भंते करुणाबोधी महाथेरो व हिंगोली येथील भन्ते पय्यावर्धन यांनी केले आहे.
याप्रसंगी शील ग्रहण, त्रिशरण वंदना व परित्राण पाठ, धम्मदेशना, साधना असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शांतिरत्न थोरात,इंजि. धंनजय भगत,ऍड. सुनील कांबळे, दीपाली पुंडगे, सुनील अंभोरे, कुलदीप कांबळे, संतोष चाटसे, वैभव खिल्लारे, सुनिल इंगोले आदींनी परिश्रम घेतले.




 
			 
		

