केळझर शिवारात अपघात
सेलू (Truck-Bike Accident) : वर्धा नागपूर महामार्गावरील केळझर येथील दप्तरी पेट्रोल पंपाजवळ बुटीबोरी येथून सेलूकडे परत येत असताना दुचाकी वाहन उभ्या ट्रकवर जाऊन आदळले. या (Truck-Bike Accident) अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अभय हरिचंद्र शंभरकर (वय ४५) रा. सेलू असे मृतकचे नाव आहे.
मृतक हा बुटीबोरी येथून कामावरून आपल्या सहकारी मित्रासह दुचाकी वाहन (क़मांक एम एच ३२ ऐक्यू ०२९५) ने सेलूकडे परत येत असताना दप्तरी पेट्रोल पंप समोर नादुरूस्त उभ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकी स्वार दोघे ही गंभीर जखमी झाले. (Truck-Bike Accident) घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने आपल्या वाहनासह घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
दुचाकीस्वार अभय यास जबर दुखापत झाल्याने त्यास नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले असता, तिथे त्याचे निधन झाले दुसरा सहकारी प्रफुल सुरेश खांडेकर (वय ४०) हा गंभीर जखमी असून त्याला सेवाग्राम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (((Truck-Bike Accident) घटनेनंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. या घटनेची सेलू पोलिसात नोंद करण्यात आली.