देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar Election: तुमसरात राजकारणाच्या रणांगणात भावी नगराध्यक्षांचे रोज नवे डाव!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Tumsar Election: तुमसरात राजकारणाच्या रणांगणात भावी नगराध्यक्षांचे रोज नवे डाव!
विदर्भभंडारा

Tumsar Election: तुमसरात राजकारणाच्या रणांगणात भावी नगराध्यक्षांचे रोज नवे डाव!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 3:38 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Tumsar Election

नगराध्यक्ष निवडणूक स्वबळावर की युतीत; नागरीकांत संभ्रम?

सुधिर गोमासे
तुमसर (Tumsar Election) : नगरपरिषदेची निवडणुक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार काय? की सर्वच पक्ष स्वबळावर लढणार? यात शहरातील महायुती व महाविकास आघाडी पक्षात १२ प्रभागात २५ जागा वाटप कसे होईल, कोणता पक्ष कोणासोबत जाईल? तिकिट वाटपावरुन अनेक पक्षाचे उमेदवार इकडून तिकडे आयात होतील.

सारांश
नगराध्यक्ष निवडणूक स्वबळावर की युतीत; नागरीकांत संभ्रम?या संभाव्य उमेदवारातून नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार ठरणार

आपल्यालाच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी त्याच पक्षात थांबायचे की दुसर्‍या पक्षात उडी मारायची ? अशा नानाविध विवंचने महाविकास व महायुतीतील घटक पक्षातील इच्छुक म्हणजेच भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांची स्वप्न रंगविणार्‍या उमेदवारांचे मन नगरपरिषद (Tumsar Election) निवडणुकीच्या उधाण वार्‍यात राजकीय हेलकावे घेत आहे. अशातच राज्यात सत्तेसाठी दोस्ती करणार्‍या महायुतीच्या घटक पक्षात मात्र, नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहाराशहरात मतदारांना राजकीय कुस्ती पाहावयास मिळणार आहे. सत्तेत असलेल्या तुमसरातील तीनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

खरच महायुतीत बेबनाव आहे की मित्र पक्षासाठी स्पेसच ठेवायचा नाही! आपणच स्वबळावर लढायचे अशी काही खेळी खेळली जात आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. कालानुरुप परिस्थिती बदल घडवत असते आणि यालाच राजकारण म्हणतात. या उक्तींचा तुमसरात सध्या प्रत्यय दिसून येत आहे. गेल्या काळात राजकारणाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. (Tumsar Election) राजकारणात घडणार्‍या घटना चक्रावून टाकणार्‍या आहेत. विशेषतः महायुती व महाविकास आघाडीत आपसातच सुरु असलेल्या राजकीय खेळ्या स्थानिक राजकारणात अस्तिव आणि वर्चस्वाचा सुप्त संघर्ष दर्शवित आहेत. विशेष करून महायुतीत सध्या मित्र पक्षापेक्षा आपली ताकद वाढविण्याची चढाओढ लागली आहे. जिल्हा नेत्यांच्या विरोधकांना आपलेसे करुन तथाकथित आप्तेष्टांनाच धडा शिकविण्याची समीकरणे महायुतीतील घटक पक्षाकडून मांडली जात आहे.

या संभाव्य उमेदवारातून नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार ठरणार

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात यांची नावे चर्चेत आहेत. सर्वांनी आपआपल्या परीने पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी राजकीय गॉडफादरकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. तुमसर नगराध्यक्ष पद नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी राखीव झाले आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून माजी नगरसेवक योगेश सिंगनजुडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, याशिन छवारे, सागर गभने, सरोज भुरे, तर भाजप कडून माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, आशिष कुकडे, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, कल्याणी भुरे, काँग्रेसकडून माजी आ.अनिल बावणकर, प्रमोद तितिरमारे, अमर रगडे, अरविंद कारेमोरे, राजेश ठाकुर, आशिष निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हेमराज नागफासे, अनिल जिभकाटे, मेहताब सिंग ठाकूर तर शिंदे सेनेकडून नितिन सेलोकर व राणे, तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुधाकर कारेमोरे यांचे नाव चर्चेत आहेत.

You Might Also Like

Abacus Competition: अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

Agricultural Sector Productivity: कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे

Vidarbha State Andolan Samiti: आज गडचिरोलीत विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

TAGGED: Tumsar election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
मराठवाडापरभणी

Selu Crime: अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पळविलेले वाहन पोलीसांनी ताब्यात

Deshonnati Digital Deshonnati Digital July 22, 2024
Yawatmal : अनुकूल पावसाळी वातावरणात ६ लाख हेक्टरवर खरीप पेरणी
Hingoli Collector: शासनाच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीबाबत दरमहा घेणार आढावा
Darva: एसटी भाडेवाढी विरोधात दारव्हा बसस्थानकासमोर उबाठा शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन
Women Urban Bank: हिंगोली महिला अर्बन को.ऑप सोसायटीच्या ठेवीदारांचे आमरण उपोषण सुरू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Abacus Competition
विदर्भवाशिम

Abacus Competition: अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

October 12, 2025
Nagpur Company Fire
विदर्भनागपूर

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

October 12, 2025
MLA Dharmarao Baba Atram
विदर्भगडचिरोलीराजकारण

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

October 12, 2025
Agricultural Sector Productivity
विदर्भगडचिरोलीराजकारण

Agricultural Sector Productivity: कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?