बोटीच्या सहाय्याने बाम्हणीचे दहा कुटुंबाचे ५१ व्यक्ती, चारगावचे १२ व्यक्ती तर वांगी येथिल एकाचे सुखरुप स्थलांतर
तुमसर/भंडारा (Tumsar Flood) : जिल्हयात नऊ व दहा सप्टेंबर रोजी संततधार पावसामुळे नाल्यांना पुर (Tumsar Flood) येऊन ओसंडून वाहत आहेत तर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे बावनथडी धरण,पुजारी टोला,भिमगड,संजय सरोवर,आदी धरण तुडुंब भरले असल्याने सदर धरणातील पाण्याचा विसर्ग वैनगंगा व बावनथडी नदी पात्रात केला असल्याने नद्यांन पुर आला आहे.
चारगाव , बाम्हणी, वांगी येथिल नागरीकांना वाचविले
परिणामी वैनगंगा व बावनथडी नदीने धोक्याची पातळी (Tumsar Flood) ओलांडली आहे. परिणामी जिल्हा व तालुका प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुध्दा दिला आहे. तालुक्यातील अकरा सप्टेंबर रोजी चारगाव,बाम्हणी,व वांगी येथिल नदी काठांवर असलेल्या नागरीकांच्या घराला मध्यरात्री पुराच्या पाण्याने वेढा घातले असल्याने चारगाव येथिल १२ व्यक्ती, बाम्हणी येथिल दहा कुटुंबाचे ५१ व्यक्ती, तर वांगी येथिल एक व्यक्ती सदर पुराच्या पाण्यात अडकले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार दाखल झाले. मध्यरात्री ची वेळ असल्याने रात्री पुराच्या पाण्यातुन अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समीतीची चमु दाखल झाली नाही. परंतु (Tumsar Flood) पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तालुका प्रशासनासमोर एक आव्हान उभे ठाकले होते. नागरीकाचा जिव वाचविण्यासाठी तालुका प्रशासनाचे अधिकारी अक्शन मोडवर आले. व ११ सप्टेंबर रोजी मध्य रात्री उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता.चक्क रात्र वैनगंगा नदीच्या पुरात काढली.
दरम्यान तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार मोहन टिकले, यांनी चक्क मध्यरात्री चारगाव टोली,बाम्हणी,व वांगी येथिल पुरात अडकलेल्या नागरिकांना मध्यरात्रीच्या सुमारास अंधारलेल्या परिस्थितीत पाण्यांत उतरुन बोटीच्या सहाय्याने (Tumsar Flood) पुरात अडकलेल्या सुखरूप काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता सुखरुप बाहेर काढले. सदर नागरिकांना सुखरूप बाहेर काढले असल्याने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या धाडसाचे सर्व थरातून कौतुक होत आहे. त्यावेळी मंडळ अधिकारी विलास धावडे,तलाठी आशिष कोकोडे,देवानंद उपराडे,अरविंद रेवतकर,मनोज वरकडे,प्रणय कोडवते,अक्षय वाघमारे,गणेश ठवकर आदीं कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.