हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : शेतीमालाचे वायदे बाजारात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी. या मागणीसाठी सर्व हळद व्यापारी व आडते यांनी संप पुकारला असल्याने हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्डातील हळद या शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार २२ आँगस्ट गुरुवार पासून बंद राहणार असल्याचे (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
ग्रेण मर्चट असोशिएशन, हिंगोली यांनी १९ आँगस्ट मंगळवारी बाजार समितीला दिलेले पत्रानुसार हळद या शेतीमालाचे वायदे बाजारामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी सर्व हळद व्यापारी व आडते यांनी संप पुकारला असल्याने (Hingoli Bazar Samiti) हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्ड, येथील हळद या शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार गुरुवार पासुन बेमुदत बंद राहणार असल्याचे पत्र बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.