नवेगाव (भु.) येथील घटना
मूल (Electric shock Death) : घराचे दुसर्या माळावर बाध्ांकाम सुरू असून सळाखीचे काम करताना सदर सळाखवर असलेल्या जीवंत विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने दोन कामगार दुसर्या माळ्यावरून खाली पडल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास नवेगाव (भु.) येथे घडली.
मूल तालुक्यातील नवेगाव (भूजला) येथील दिलीप गिरडकर यांच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम करणारे विनोद बोरकुटे (४०) व हरी शशिकांत चुदरी (२८) हे दोघेही मिस्त्री रेलिंग बांधकाम करीत असताना एकाने हातात सळाख धरली होती व दुसरा मिस्त्री याने त्याच सळाखिला वाकवत असताना ती सळाख एकदम वर उसळून घराच्या वरुण गेलेल्या ११ हजार व्हॅटच्या मुख्य प्रवाहाच्या लाईनला स्पर्श झाल्याने दोन्ही कामगारांना विजेचा धक्का लागला. यामुळे ते दोघेही स्लॅब वर पडल्याने गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ गावकर्यांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Electric shock Death) मृतकातील विनोद बोरकुटे हो सदर घराचे बांधकाम करणार ठेकेदार असून त्यांना ३ मुली व पत्नी असा मोठा परिवार आहे. तर हरी चूदरी हा कामगार अविवाहित असल्याचे समजते. महावितरण विभागाने मृतकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून होत आहे.