Parbhani suicide cases :- बँकेचे कर्ज, अतिवृष्टीमुळे झालेले पीकाचे नुकसान या विवंचनेत पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्यांनी (Farmers) आत्महत्या केली आहे. एकाने नदी पात्रात उडी घेतली तर दुसर्याने गळफास लावुन आपले जीवन संपविले. सदर प्रकरणी १७ ऑक्टोबरला पूर्णा पोलिस ठाण्यात (Police station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकाने नदी पात्रात घेतली उडी तर दुसर्याने घेतला गळफास
बाळासाहेब माने यांनी खबर दिली आहे. भगवान विठ्ठलराव माने (वय ६० वर्ष, रा. पिंपरी देशमुख) या शेतकर्याने बँकेचे कर्ज आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या विवंचनेत पिंपरी देशमुख ते ममदापूर शिवारात नदी पात्रात उडी घेऊन आपले जीवन संपविले. मृतदेह आढळून आल्यानंतर पूर्णा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. पडलवार करत आहेत. दुसरी घटना तालुक्यातील देगाव येथे घडली. मन्मथ वळसे यांनी खबर दिली आहे. दिपक गंगाप्रसाद वळसे (वय २६ वर्ष) असे मयताचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे शेतीत झालेले पिकाचे नुकसान, घरातील आर्थिक टंचाई व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत दिपकने छताच्या कडीला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास उघडकीस आली. पूर्णा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. इंगोले करत आहेत.