८१८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली (Isapur Dam) : हिंगोलीसह नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचन व पिण्याच्या पिण्यासाठी महत्त्वाचे असलेल्या इसापूर धरणात पाण्याची आवक पाहता धरणाचे १४ आँगस्ट गुरुवारी दुपारी १२ वाजता दोन दरवाजे ५० सेंटीमीटरने उचलून ८१८७ क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. यापूर्वी (Isapur Dam) धरणाचे तीन दरवाजे उघडले होते. आता एकुण पाच दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
इसापूर धरणाचा (Isapur Dam) प्रकल्पीय पाणीसाठा ४४१ मीटर असून धरणात १२७९ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता आहे. यामध्ये ९६४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा क्षमता आहे. सध्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा क्षमता ९०८ दशलक्ष घनमीटर असून धरणात ९४.६७ टक्के पाणीसाठा आहे.
धरणातील पाणीसाठ्याची आवक लक्षात घेऊन पाणीसाठा क्षमता स्थिर ठेवण्यासाठी गुरुवारी धरणाचे दोन दरवाजे दुपारी १२ वाजता ५०
सेंटीमीटरने उघडून त्यातून ८१८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. (Isapur Dam) धरणामध्ये पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे, या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
