वडधा (Gadchiroli) :- बोरी कडून वडधाकडे येत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात (Accident)दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज २७ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बोरीचक गावानजीक घडली. रोहित रमेश नरुले (२३) रा. अमिर्झा, अशोक घोडमारे (१४) रा.भिकारमौशी अशी जखमींची नवे असून अन्य २ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दोघे जण गंभीर जखमी
प्राप्त माहितीनुसार भिकारमौशी येथील डेकोरेशनचे साहित्य ट्रॅक्टरने बोरीचक येथे आज नेले. दरम्यान डेकोरेशनचे साहित्य खाली करून वापस येत असताना बोरीचक गावानजीक अचानक ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खताच्या ढिगार्यावर ट्रॅक्टरचा इंजिन गेल्याने ट्रॅक्टरचा इंजीन रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. यामध्ये दोघे दबल्या गेले व अन्य दोघेजण बाजूला पडले. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती नागरिकांना होताच तात्काळ घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली व लगेच जखमींना वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Health Centers) नेले . या ठिकाणी प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (hos हलविण्यात आले आहे.




