एकावर गुन्हा दाखल, तरुणांना उपचारार्थ नांदेड येथे हलविले
परभणी/सेलू (Knife Attack) : शहरातील गायत्री नगर परिसरात दोन युवकांवर प्राणघातक चाकू हल्ला केल्या प्रकरणी शनिवार ८ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. हल्ल्यातील (Knife Attack) दोन्ही जखमी युवकांची अवस्था गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गायत्री नगर परिसरात कमानीच्या समोर आकाश भीमराव शिरसाठ (वय २७ वर्ष) या युवकावर प्रेम बाळू नाटभजे या आरोपीने शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्राणघातक (Knife Attack) चाकू हल्ला केला. आरोपीने त्यांच्या पँटच्या मागे लावलेला चाकू काढून आकाश याच्या पाठीवर आणि कमरेवर सभासप वार करत त्याला गंभीर जखमी केले.
यावेळी आकाशच्या मदतीसाठी धावून आलेला प्रेम अर्जुन शिरसाट ( वय १७ वर्षे) याच्या पाठीवर सुद्धा आरोपीने वार करून गंभीर जखमी केले. इच्छित मुलीशी लग्न होऊ न शकल्याच्या कारणामुळे आरोपीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी केल्याप्रकरणी आकाश भीमराव शिरसाट याने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम नुसार प्रेम वाळू नाटभजे (रा.गायत्री नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत.
दरम्यान शहरातील गायत्री नगर मध्ये दोन तरुणांवर झालेल्या या जीवघेणा चाकूहल्ल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या दोन तरुणांना प्रथम सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Knife Attack) गंभीर जखमी तरुणांना पुढील उपचारार्थ नांदेड येथे दाखल करण्यात आली आहे.