Karanja accident :- दुचाकी अपघातात (accident) दोन युवक गंभीर जखमी झाले.ही घटना नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील नायरा पेट्रोलपंपा जवळ 8 जुलै रोजी रात्री 8 वाजताचे दरम्यान घडली. अनिल दिगंबर राऊत वय 28 वर्ष व वैभव पुरूषोत्तम मिसाळ वय 27 वर्ष अशी जखमींची नावे असून ते दोघेही अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
पिंपळगाव येथे जात असताना मार्गातील अपघातस्थळी दुचाकीला अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार अपघातातील जखमी युवक कारंजा येथून राहत्या गावी पिंपळगाव येथे जात असताना मार्गातील अपघातस्थळी दुचाकीला अपघात झाल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने (Ambulance) उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे.