सा. बा. विभागाचे अभियंता यांचे कौतुक!
मानोरा (Shri Sant Sewalal Maharaj) : राज्य शासनाकडून बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत (Shri Sant Sewalal Maharaj) श्री संत सेवालाल महाराज इमारतीला राज्यातून उत्कृष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
शासनाने राज्यात दर्जेदार उत्कृष्ठ बांधकाम झालेल्या रस्ता, पूल, इमारत आदींचे पुरस्कार जाहीर केले आहे. यामध्ये वाशिम जिल्हायातील पोहरादेवी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत निर्माण झालेल्या (Shri Sant Sewalal Maharaj) श्री संत सेवालाल महाराज इमारतीला शासनाने राज्यसतरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
या उत्कृष्ठ विकास कामामध्ये सहभाग असणाऱ्या तत्कालीन मुख्य अभियंता गिरीश जोशी, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, अनंत खोडे उपविभागीय अभियंता अनंत खोडे, शाखा अभियंता पुरुषोत्तम राठोड, शाखा अभियंता सतीश चव्हाण, महसूल व विविध विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार उमेश कासट, विकास महाजन, सुरेश पटेल, अमरदिप बहेल व इतर सर्वांचे कौतुक होत आहे.