मानोरा (Manora) :- मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या (heavy rain) पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु अद्यापही अनेक शेतकरी (Farmers) नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांना तत्कालीन शिंदे, फडणवीस सरकारकडून मदत जाहीर
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्कालीन शिंदे, फडणवीस सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली होती, परंतु शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची आर्थिक मदत अजुनही अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्याने अनेक शेतकरी तहसील व कृषी विभागाच्या (Department of Agriculture) कार्यालयाची पायरी झिजवत आहे. मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीने कहर केल्यामुळे खरीब हंगामातील सोयाबीन, तुर, कपाशी यासह फळपिकांसह जमिनी खरडून गेल्याने पिक व शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने यावर्षी नुकसान भरपाई ची मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर एवढी केली आहे. यामध्ये कोरडवाहू क्षेत्राकरिता हेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढी मदत शासनाने जाहीर केली होती.
परंतू, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त भावना व्यक्त करीत आहे . त्यामुळे तात्काळ अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी डॉ अरविंद यावलकर, देवनाथ भोयर, विनोद ठाकरे, डॉ भास्कर धामणीकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.




