तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
तातडीने जनदुरक्षा विधेयक हटवून शेतीचे पंचनामे करा!
मानोरा (Shiv Sena Andolan) : जनविरोधी, घटनाविरोधी व लोकशाही हक्क नाकारणारा महाराष्ट्र जनसुरक्षा 2024 घटना विरोधी विधेयक सत्ताधारी सरकारने हटवावे, तसेच सतत व संततदार मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसाने नुकसान होऊन पाण्याखाली आलेल्या पिकांचे पंचनामे करावे, याबाबत उबाठा शिवसेना, युवासेना पक्षाच्यावतीने दि. १० सप्टेंबर रोजी तहसील कचेरीवर धरणे आंदोलन करून पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणे संदर्भात तहसीलदार मार्फत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात करावी, सत्ताधारी महायुती सरकारने हे जन सुविधा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कुटबाजी हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. सत्ताधारी सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक डाव्या संघटना आणि डाव्या संघटनाशी संबंधित लोकांना, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाहीचा वापर करत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी भीती विविध संघटना व कार्यकर्तामध्ये भीती निर्माण करण्यासाठी आहे. त्यामुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये या विधेयकामुळे प्रचंड असंतोष व भितीचे वातावरण पसरले आहे.
या जनसुविधा विधेयक विरोधात संपूर्ण राज्यात प्रचंड रोष व संताप जनतेतून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदरील जनसुविधा विधेयक सत्ताधारी महायुती सरकारने रद्द करावे, याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने सरकारचा निषेध करून आंदोलन पुकारून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी (Shiv Sena Andolan) उबाठा शिवसेनेचे नेते अनिल राठोड, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पवार, उपतालुका प्रमुख प्रा. विकास चौधरी, तालुका संघटक बाळू राठोड, उपतालुका प्रमुख अजय देशमुख, नंदू चौधरी, देवानंद हळदे, सर्कल प्रमुख गणेश राजगुरे, घनश्याम मासोदकार, शेषराव राठोड, युवासेना तालुका प्रमुख अभय कुऱ्हाडे, उपतालुका प्रमुख देवा कुऱ्हाडे, युवा सेना इंझोरी सर्कल प्रमुख आकाश हळदे, खुशाल इंगोले, गोपाल चांदोडे, राजू लडके, भिमराव राठोड, नरेंद्र राऊत, सरपंच उमेश राठोड, सुभाष जोंधळेकर, अलताब बेग, विकास ठाकरे, जय कुऱ्हाडे, आशिष जाधव आदीसह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.