परभणी(Parbhani):- ओबीसीतून (OBC) मराठा आरक्षण मागणीसाठी येत्या 4 जून पासून मी उपोषणाला बसणार असून मराठा समाजाने या दिवशी अंतरवाली सराटी येथे यावं असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी शहरातील साईनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह भेटी दरम्यान केले आहे .
मनोज जरांगे पाटील हे कार्यक्रमास भेट देण्यासाठी बुधवारी सकाळी पाथरी शहरात दाखल
मराठा आरक्षणयोद्धा मनोज जरांगे पाटील बुधवार 22 मे रोजी दुपारी दोन वाजता पाथरी शहरातील साईनगर येथे सुरू असलेल्या भागवत कथा (Bhagavad Katha) व अखंड हरिनाम सप्ताह ठिकाणी भेट देण्यासाठी आले असता यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते .
कार्यक्रम ठिकाणी साईनगर येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे गंगाखेड येथील एका कार्यक्रमास भेट देण्यासाठी बुधवारी सकाळी पाथरी शहरात आले होते. यावेळी त्यांचा आष्टी फाटा येथे सकल मराठा समाजाच्या (Maratha society) वतीने स्वागत आले. साईनगर येथील भेटीनंतर जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीकडे प्रस्थान केले होते.