अर्जुनी मोर (Itiyadoh dam) : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोर तालुक्यातील (Itiyadoh dam) इटियाडोर धरण गोठणगाव येथे मासोळी संकलन करणाऱ्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू (Youth death) झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजता घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव हेमराज रामदास सिकरामे वय वर्ष 40 राहणार बोडगाव सुरबन असून परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. वृत्त असे की, इटियाडोह धरण परिसरात भोई, ढिवर तथा बंगाली सामुदायासह इतरत्रही समाजातील लोक इटियाडोह धरणात व बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात मासोळी संकलनाचे काम करतात. त्यातून मिळालेल्या उत्पादनातून आपला प्रपंच चालवतात.
गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सतत धार पाऊस बरसत आहे. याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मासोळी संकलन करता येईल. यासाठी त्या (Itiyadoh dam) धरणात गोठणगाव येथून जवळच असलेल्या बोडंगाव सूरबन येथील मृतक हेमराज त्याचा भाऊ अजय रामदास शिकराने व 37 दोघांनी तारीख 9 सप्टेंबर रोजी इटियाडोह धरणाच्या मुख्य सांडव्यात मासोळी पकडण्यासाठी जाळ टाकली होती. आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 सकाळपासून पावसाची सतत धार असल्याने टाकलेल्या जाळीत मोठ्या संख्येने मासोळ्या जमा झाले असतील ते काढून मोठी कमाई यातून उदरनिर्वाह करता येईल या हेतूने या दोन्ही भावंडांनी आज दुपारी इटियाडोह धरण गाटले दरम्यान (Youth death) मृत्यू हेमराज यांनी नेहमीप्रमाणे सांडव्यात टाकलेली जाडी ओढण्याचा प्रयत्न केला.
मात्र दुर्दैवाने त्याचा पाय घसरला त्यात अगदी काही क्षणात तो विसर्गाच्या पाण्यात वाहून गेला परत वर कधी आलाच नाही. त्यामुळे घाबरलेला मृतकाचा भाऊ अजय याने आजूबाजूच्याना ओरडून बोलावले काही काळ प्रतीक्षा केली मात्र वेळ निघून गेली हा रडत घरी आला आणि त्याने घडलेला प्रसंग घरच्यांना सांगितला गावकऱ्यांच्या वतीने त्याची माहिती केसरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार केसरी पोलिसांच्या वतीने घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला असून या (Itiyadoh dam) घटनेमुळे बोंडगाव गोठणगाव तसेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास केसरीचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे करीत आहेत.
मृतक हेमराज हा अविवाहित असून आपल्या वयोवृद्ध आई-वडील व कुटुंबीयांचा पालन पोषण करणारा कुटुंब प्रमुख होता. काबाडकष्ट केल्याशिवाय कुटुंबाला दुसरे कुठलेही उदरनिर्वाहाचे साधन नव्हते जातीने आदिवासी असला तरी मत्स्य संकलन करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचा त्याच्या अंग मेहनतीवर आणि श्रमावर कुटुंब आधारित होते त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.