वरोरा (Chandrapur ) :- वरोरा शहरातील बोर्डाचौकात आज दि.१५ च्या रात्री पहाटे २ वाजता अज्ञात चोरट्यांनी ४ दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून दुकानातील रोख व इतर साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर चोरटे हे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मध्ये कैद झाले आहे.
चोरटे हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद
नागपूर चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या बोर्डा चौकात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी ४ दुकानाचे शटर वाकवून रोख रक्कम व इतर साहित्य चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. ऋषभ किराणा या दुकानातून अमेरिकल गोल्ड सिगारेट,काही परिफ्ुयम असा सात ते आठ हजाराचा माल, आराध्य किराणा मधून पंधरा हजार रू. रोख, सोबत कसाटा आईस्क््रीमचा बॉक्स चोरट्यांनी लांबविला, न्यु शिव कृपा प्रोव्हिजन्स मधून पाच हजार कॅश, आरती प्रोव्हिजन्स ढेंगळे बंधू येथून तीन हजाराची चिल्लर व सिगारेट पाकीट असा एकूण अंदाजे ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र या ठिकाणी चोरटे हे चोरी करीत असलेले सीसीटीव्ही फुटेज आले असून चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांना एक प्रकारे आवाहन आहे. सदर घटनेची नोंद वरोरा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.