बुलढाणा (Banjara Samaj) : राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वत्र आंदोलन सुरू असतानाच राज्यात (Banjara Samaj) बंजारा समाजानेही आम्हाला एस. टी. प्रवर्गात टाकावे अशी मागणी केली आहे. आता राज्यात ठिकठिकाणी ही मागणी जोर धरू लागली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा मोठ्या प्रमाणावर वाडी- तांड्यावर मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज राहतो.
जिल्ह्यातील (Banjara Samaj) बंजारा बांधवांनी सुध्दा या मागणीसाठी आता पुढाकार घेतला असून उद्या सोमवार १५ सप्टेंबर रोजी समाज बांधवांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील समस्त बंजारा बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, सोमवार १५ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या ST प्रवर्गातील आरक्षण मागणी संदर्भात चर्चेसाठी व आपल्या जिल्ह्यातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीला उपस्थित राहावे.
ही बैठक सकल गोरबंजारा समाज (Banjara Samaj) बुलडाणा जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून समाज बांधवांनी सदगुरू सेवालाल महाराज मंदिर सुंदरखेड, बुलढाणा येथे सकाळी ११ वाजता उपस्थिती रहावे, असे आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.