Chandrapur suicide case :- राज्यात शेतकरी आत्महत्या (suicide)दिवसागणिक वाढत असून गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील एका तरुण शेतकर्याने कर्जापोटी घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ सप्टेबर रोजी घडली असून प्रशांत प्रकाश खारकर (वय ३२ ) वर्ष असे शेतकर्याचे नाव आहे.
विष प्राशन करून आत्महत्या
प्राप्त माहितीनुसार मृतक प्रशांत खारकर हे धाबा येथील रहिवासी असून पत्नी व आपल्या दोन प्रियांशी आणि स्वरांशी या मुलीसह धाबा येथे राहत होते.खारकर यांचा मुख्य व्यवसाय शेती असून सन २०१७ मध्ये त्यांनी शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँक धाबा येथून कर्ज घेतले. मात्र दोन वर्ष अपेक्षेप्रमाणे त्यांना पिक झाले नाही. त्यामुळे एकीकडे कर्ज वाढत असताना हाताला कोणतेच काम मिळत नव्हते भेटेल तेव्हा विद्युत फिटिंग चे खाजगी काम करून कुटुंबाचा कसाबसा गाडा चालवायचा. मात्र मनात असलेल्या कर्जाची परतफेडीची चिंता प्रशांतला शांतपणे झोपू देत नव्हती अश्यातच त्यांनी कायमचे जग सोडण्याचा निर्णय घेतला. दिनांक १२ सप्टेंबर रोजी घरी कुणी नसतांना त्यांनी सकाळी ९.०० वाजता विष प्राशन करून आत्महत्या (suicide) केली. ११ वाजता शेतातून आई आणि मोठे भाऊ घरी आल्यानंतर प्रशांत हा तडफडत दिसला लगेचच त्याला ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आणण्यात आले.
तिथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले.वाटेत प्रकृती चिंताजनक वाटल्याने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह (dead body) अंत्यसंस्कार करिता धाबा येथे आणण्यात आला सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे.




 
			 
		

