Nagpur Crime Case :- नागपूर जिल्ह्यातील भिवापूर उमरेड मार्गावर शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. त्यात सांठगाव येथील काकू व पुतण्यासह पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला. मृतामध्ये किशोर माधवराव मेश्राम (४२) व गुणाबाई देवराव मेश्राम (६५) तसेच ५ वर्षीय नातू सार्थक अतुल मेश्राम यांचा समावेश आहे. या अपघाताने चिमूर तालुक्यातील साठगाव येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा एकाच वेळी अपघातामुळे (Accident) जीव गेल्याने साठगाव येथे शोककळा पसरली आहे.
तीन व्यक्तींचा एकाच वेळी अपघातामुळे जीव गेल्याने साठगाव येथे शोककळा
साठगांव येथील रहिवासी असलेले किशोर मेश्राम हे काकू गुणाबाई व चिमूकला सार्थकला घेऊन बुटीबोरी येथून साठगांव कडे दुचाकीने परत येत होते. ते भिवापूर तालूक्यातील गोंडबोरी फाट्याजवळ सायंकाळा ५.३० वाजता आले असतांना समोरुन येणार्या टिप्परने मागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पुतण्या किशोर व काकू गुणाबाई हिचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर जखमी सार्थक ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचाही रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी टिप्पर चालकाने टिप्पर सह घटनास्थळावरून पलायन केले. भिवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून चालकाचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना प्रशासनाच्या निष्काळ जीपणामुळे घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही दुर्घटना महसूल विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे घडली असून एन्ट्रीच्या नावाने या अवैध रेती वाहतूक दारांकडून वसुलीच्या नादात घडली असल्याचे उघडतीस येत आहे. भिवापूर पासून रेतीने भरलेल्या या टिप्परचा महसूल अधिकारी पाठलाग करीत असल्यामुळे चालकाने टिप्पर चा वेग वाढवला आणि गोंडबोरी फाट्याजवळ टिप्पर भरधाव वेगात असल्यामुळे हा अपघात घडून आला असल्याची माहिती नागरिक देत आहेत. या दुर्घटनेमुळे मात्र साठगांव येथे शोककळा पसरली आहे.