अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
मानोरा (Anil Rathod) : माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड (Anil Rathod) यांनी दि. २८ ऑक्टोंबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडणार असल्याची खमंग चर्चा मतदार संघात सुरू आहे.
अनिल राठोड (Anil Rathod) यांनी लोकसभेत महाविकासचे रात्रंदिवस काम केले. महा विकास आघाडीचे घटक उबाठा शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. महा विकास आघाडीने भाजपा पक्षाकडून आयात उमेदवार दिल्याने विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा हातात घेऊन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अरविंद पाटील इंगोले, अपक्ष उमेदवार मधुसूदन राठोड, सरपंच उमेश राठोड, इंदल भोला राठोड आदीसह महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.




 
		

