दिवसागणिक वाढत चालली अपघाताची मालिका
यवतमाळ (Accident prone road) : शहरातून आर्णीकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका दिवसागणिक वाढतच चालली आहे.जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित त्या उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने वनवासी मारोती परिसर चौक तर हुंदाई शोरूमजवळचा वळण रस्ता अलीकडे अपघाताचा चौक (Accident prone road) म्हणून ओळखल्या जात आहे. परिणामी याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना वाढला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाची नियोजन शून्यता व हलगर्जीपणा आता निष्पाप जीवांवर ओढविण्याचे संकेत उमटले आहे.
गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास पृणत्वास आले.राष्ट्रीय महामार्ग बनविताना वळण रस्ता त्यासोबतच अँगल ऑफ बँकिंग (जेव्हा एखादे वाहन वाकलेल्या मार्गावर चालते, तेव्हा ते विशिष्ट कोनात झुकलेले असावे ),उड्डाणपूल निर्मिती,बायपास मार्ग,नवीन शहरात शिरकाव मार्ग नियम,त्यासोबतच नानाविध बाबींचा अभ्यास अनिवार्य होता.मात्र वास्तविकतेत बहुतांश बाबी बांधकाम करताना वगळण्यात आल्या.
जिल्हा प्रशासनाची चुप्पी बितणार निष्पाप जीवांवर
राष्ट्रीय महामार्गावरील जे कठडे बसविण्यात आले होते,त्यापैकी काही कठडे ढाबा व पेट्रोल पंप मालकांनी काढल्याने त्यांच्यावर सुरक्षिततेच्या निकषांखाली मध्यंतरीच्या काळात गुन्हे दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये होत असलेल्या किरकोळ अपघाताची बाब लक्षात घेता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी या दोन्ही ठिकाणी (Accident prone road) उड्डाणपूल बनविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामुळे बांधकाम झालेला मार्ग पुन्हा फोडण्यात आल्यामुळे कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला.
उड्डाणपूल बनविण्याचे शहाणपण प्रशासनाला राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करतेवेळी सुचले असते तर आजतागायत घडलेले अपघात कदाचित घडले नसते.उशिरा सुचलेले शहाणपण आता नव्या संकटाच्या माध्यमातून निष्पाप जीवांवर ओढवले जात आहे. दोन्ही ठिकाणी दिवसागणिक अपघात वाढत चालले आहे.आतापर्यंत गेल्या सहा महिन्यात ४ ते ५ पेक्षा अधिकांचा याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला.त र इतर (Accident prone road) भीषण अपघातात अनेकांना गंभीर दुखापती झाल्या.यासंदर्भात योग्य वेळी योग्य नियोजन केले असते तर जीवित हानी टळली असती शिवाय सर्वसामान्यांचा पैसाही वाचला असता.
गेल्या काही महिन्यांपासून अलीकडे आता दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामामुळे पुन्हा जास्त प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी दोन्ही बाजूचे सर्व्हिस लेन सुरु करून उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु करणे अपेक्षित होते शिवाय काही निकष पाळणे महत्वाचे होते. मात्र यामधील कुठलेही निकष पाळल्या न गेल्यामुळे वाढत्या अपघातामुळे हुंदाई शोरूम समोरील परिसर व वनवासी मारोती चौक (Accident prone road) अपघातांचा चौक म्हणून ओळखल्या जात आहे.एकूणच यासंदर्भात सध्याघडीला असलेली प्रशासनाची चुप्पी संशयाच्या भोवर्यात सापडणारी आहे. एकूणच या व्यवस्थेत प्रशासकीय यंत्रणेकडून नेमका काय तोडगा काढल्या जाते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
बळीराजा पार्टीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
वनवासी मारोती परिसरासमोरुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु आहे. (Accident prone road) पुलाचे काम सुरु करताना दोन्ही बाजूचे सर्व्हिस लेन तयार करण्यात न आल्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहने एकाच मार्गावर धावत आहे.रस्त्यावर दुभाजक म्हणून नियमबाह्य सिमेंटचे ब्लॉक लावण्यात आले आहे.त्यावर रिफ्लेक्टर वा फलक सुद्धा लावण्यात आले नाही.परिणामी दोन्ही दिशेने येणार्या वाहनांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढल्याने जीवित हानी वाढली असून मोठ्या प्रमाणात गैरसोय वाढली आहे.
त्यामुळे आतापर्यंत झालेल्या अपघातांच्या (Accident prone road) घटनांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरून सुविधा व उपाययोजना राबविण्यात यावी. असे न झाल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन बळीराजा पार्टीचे अध्यक्ष श्याम बजाज, अॅड. जयसिंग चव्हाण,विजय लाखानी, अंबुलकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.