वसंतनगर डीबी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पुसद (Vasantnagar Police Station) : वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री शिवाजी शाळेसमोरील रस्त्यावरून एका मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवून वाशिम रोड वरील निंबीकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंपालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्या मुलीचे डोके मारून तिला गंभीर जखमी करून जबर मारहाण केल्याची घटना 26 जून रोजी दुपारी पाच वाजता दरम्यान घडली होती. मुलीने घाबरलेल्या अवस्थेत (Vasantnagar Police) वसंतनगर पोलीस ठाणे गाठून आरोपी किशोर संजय आडे वय 23 वर्ष रा. मांडवा याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
नांदेड रेल्वे स्थानकावरून जेरबंद
या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस (Vasantnagar Police) ठाण्यात आरोपी विरुद्ध कलमान्वये ॲट्रॉसिटी ॲक्ट पॉक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर हे करीत होते. गुन्हा घडल्यापासून आरोपी किशोर संजय आडे हा फरार झाला होता. तर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. गोपनीय खबर्यांमार्फत येथील डीबी पथकाचे अशोक चव्हाण, मुन्ना आडे,व संजय पवार आरोपी हा नांदेड रेल्वे स्थानकावर असून तो मुंबईच्या दिशेने पळण्याची माहिती मिळाली. वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांना वरील माहिती डीबी पथकाने दिली.
वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात डिबी पथकाचे अशोक चव्हाण मुन्ना आडे व संजय पवार यांनी नांदेड रेल्वे स्टेशन गाठत अत्यंत शिताफीने आरोपी किशोर संजय आडे याला जेरबंद करून पुसद येथे आणले उपविभागीय पोलीस कार्यालयात सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या समक्ष त्याला उभे केले. सदर आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाचा पीसीआर दिल्याची माहिती (Vasantnagar Police) वसंतनगर पोलिसांनी दिली.




