दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व मान्यवर करणार मार्गदर्शन
गडचिरोली (Vidarbha State Andolan Samiti) : विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोलीच्या वतीने विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील पोटेगांव मार्गावरील यमुना हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
दहा लाख कोटी कर्जाच्या ओझ्या खालीच्या दबलेल्या महाराष्ट्रात विदर्भातील लोकांना काय भविष्य आहे, शिक्षणाचा अनुशेष, आरोग्य सुविधांचा अनुशेष, चांगल्या रस्त्यांचा अनुशेष, वैद्यकीय शिक्षण तंत्रशिक्षणाचा अनुशेष, सिंचनाचा अनुशेष, उद्योगाचा अनुशेष, शेतकर्यांच्या आत्महत्या, रोजगारासाठी युवकांचे स्थलांतर अशा परिस्थितीत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हा एकच पर्याय आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील जनतेपर्यंत विदर्भ राज्य मागणीचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी पूर्व (Vidarbha State Andolan Samiti) विदर्भाचा विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जनसंकल्प मेळाव्याचे उदघाटक म्हणून (Vidarbha State Andolan Samiti) विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. वामनराव चटप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार , उपाध्यक्ष सुनिल चोखारे,दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे,अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पि.आर राजपुत,अॅड . सुरेश वानखेडे, महिला अध्यक्षा रंजना मामर्डे,युवा आघाडीचे मुकेश मासुरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रशिह ठाकुर , दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जिल्हा समन्वयक अरुण पा. मुनघाटे, घिसु पा. खुणे, रमेश उपलवार, महिला आघाडी अध्यक्ष अमिता मडावी, डॉ.चंद्रशेखर डोंगरवार, प्रा. मुनिश्वर बोरकर,रमेश भुरसे, पांडुरंग घोटेकर,गोपाल रायपुरे, भोजराज कान्हेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर संकल्प मेळाव्यास बहुसंख्येनी सहकार्यासह उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा आणि वेगळा विदर्भाची मागणी पुर्ण करावी असे आवाहन दशरथ साखरे, मारोती भैसारे,प्रमोद राऊत, नासीर जुम्मन शेख ,महानंदा आतला, पांडुरंग नागापुरे, चंद्रकांत शिवणकर, मोतीराम लाटेलवार, चोखोबा ढवळे, माधुरी गावळे,कांता हलामी, मुत्ताजी दुर्गे, विशाल दहिवले,प्रमोद सरदारे, गुरुदेव भोपये, वेणुुदास वाघरे, तुळशीदास सहारे आदिंनी एका पत्रकातून केले आहे.