पिडितेच्या तक्रारीवरुन आरोपींवर परभणीतील बामणी पोलिसात गुन्हा दाखल…!
परभणी (Torture And Threats) : २५ वर्षीय पिडिते सोबत बळजबरीने संबंध ठेवत तिचे व्हिडिओ काढले. त्यानंतर भिती दाखवून वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी ३१ जुलैला पिडितेच्या तक्रारीवरुन बामणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना पुढील तपासासाठी पालघर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पिडिता ही जिंतूर तालुक्यातील रहिवाशी आहे. आरोपीने सुरुवातीला पिडितेसोबत (Torture And Threats) बळजबरीने अत्याचार केला. तिची चित्रफित काढून पिडितेला भिती दाखवून वारंवार अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. आरोपीने पिडितेला घरी आणले. या ठिकाणी इतर पाच ते सहा अनोळखी इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पिडितेला मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन रमेश जाधव, संतोष राठोड, बाळू राठोड, विष्णू जाधव, बाबाराव जाधव यांच्यासह तीन महिलांवर तसेच इतर पाच ते सहा अनोळखींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बामणी पोलिसात गुन्हा नोंद करुन पुढील तपासासाठी गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
ओळखीतील तरुणाने केला विनयभंग
परभणी : वाईट उद्देशाने हात धरत गाडीवर बस तसेच मला नाही बोललीस तर मारुन टाकीण, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही (Torture And Threats) घटना २८ जुलै रोजी रात्री आठ ते साडे आठ या दरम्यान कोतवाली पोलीस ठाणे हद्दित घडली. पिडितेच्या तक्रारीवरुन ३१ जुलैला रणजीत भगाडे याच्यावर विनयभंग आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 
			

