जियारत क्रॉस परिसरातील कारवाईत दोन वाहने उद्ध्वस्त केल्याचा दावा; सुराबमध्येही सात जवान ठार झाल्याचे BLAचे म्हणणे
पाकिस्तानमधील बलुचिस्तान पुन्हा एकदा हिंसक कारवाईने चर्चेत आला आहे. गुरुवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) केला आहे. जियारत क्रॉस परिसरात झालेल्या या हल्ल्यात २५ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. याशिवाय लष्कराची दोन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला पाकिस्तानी लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळाल्याची माहिती समोर आलेली नाही.
‘द बलुचिस्तान पोस्ट’च्या वृत्तानुसार, BLAच्या प्रवक्त्याने या कारवाईची माहिती दिली. जियारत क्रॉस भागातून पाकिस्तानी लष्कराचा ताफा जात असताना त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे संघटनेने सांगितले. लष्करी वाहनांवर गोळीबार करण्यात आल्याचा दावा असून, या हल्ल्यात दोन वाहने उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये एका लष्करी ट्रकचाही समावेश असल्याचे BLAने नमूद केले आहे.
3 coordinated strikes across Balochistan in a single day,but Rawalpindi’s top brass will still insist the security envmnt is "robust & stable."Maybe if they spent half as much time fighting militancy as they do hunting down innocents, they’d hold ground.#CorruptPakArmy@BabaG512 pic.twitter.com/OvYYnLmN7v
— Muskaansuri (@muskaansuri1) September 4, 2026
हल्ल्यानंतर BLAने सुरुवातीला १८ जवान ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर संघटनेने मृतांचा आकडा वाढवत २५ जवानांचा मृत्यू झाल्याचे म्हटले. मात्र, या आकडेवारीची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही आणि पाकिस्तानच्या लष्करानेही याबाबत अधिकृत माहिती दिल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, या कारवाईशी संबंधित १ मिनिट ११ सेकंदांचा व्हिडिओ ट्रेलर BLAकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जियारत क्रॉस परिसरातील हल्ल्याची दृश्ये असल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच घटनास्थळी मृतदेह आणि कथितरीत्या ताब्यात घेतलेली शस्त्रे दाखवण्यात आल्याचेही BLAने म्हटले आहे.
🚨 BREAKING: A large number of Baloch fighters have entered and taken control of Bhag city in Bolan, Balochistan.
— BharatIntel360 (@BharatIntel360) September 4, 2026
Police stations and banks are under their control, while clashes continue at several locations across the city. pic.twitter.com/AvbVRLcnQd
सुराबमध्येही लष्करी वाहनाला लक्ष्य केल्याचा दावा
याच काळात सुराबमधील हाजिका परिसरात आणखी एका कारवाईचा दावा BLAने केला आहे. संघटनेच्या ‘स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वाड’ने (STOS) ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
BLAच्या दाव्यानुसार, स्फोटकांनी भरलेले वाहन रिमोटच्या माध्यमातून उडवण्यात आले. या स्फोटात पाकिस्तानी लष्कराचे एक वाहन नष्ट झाले असून सात जवान ठार झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
या दोन्ही घटनांबाबत BLAने केलेल्या दाव्यांना पाकिस्तानी लष्कराकडून अधिकृत पुष्टी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.