Disease Outbreak

नेपाळमध्ये महापुरानंतर रोगराईचे संकट; ९६२ मृत, ४ हजारांहून अधिक बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराच्या तडाख्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

नेपाळमध्ये महापुरानंतर रोगराईचे संकट; ९६२ मृत, ४ हजारांहून अधिक बेपत्ता

Disease Outbreak

गंडक नदीत २३ मृतदेह आढळले; त्रिशुली प्रकल्पांतील १५०हून अधिक जण अद्याप बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराच्या तडाख्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २६ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत ९६२ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर अनेक भागांत मृतदेह आढळत असून, आता रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मृतदेह सडू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून बचाव आणि शोधमोहीम राबवताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

नुवाकोट जिल्ह्यातील वेत्रावती परिसरात बचावकार्यादरम्यान एका घरातून तब्बल २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, नेपाळमधील पुराचा परिणाम भारतीय सीमावर्ती भागांवरही दिसून येत आहे. भारतीय सीमेला लागून वाहणाऱ्या गंडक नदीत २३ मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह नेपाळी यंत्रणांच्या ताब्यात देण्याची तयारी भारताकडून सुरू आहे.

महापुराला अनेक दिवस उलटूनही बेपत्ता नागरिकांचा शोध अद्याप पूर्ण झालेला नाही. जवळपास ४ हजार नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. रसुवा जिल्ह्यातील उत्तरगया गावातील सुमारे ३५० विद्यार्थीही बेपत्ता आहेत. या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पातील परिस्थितीही चिंताजनक आहे. दुर्घटना घडली त्यावेळी प्रकल्पात सुमारे ४० ते ४२ अभियंते उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घटनेनंतर सहावा दिवस उलटूनही या ठिकाणी बचावकार्य सुरू झालेले नाही.

त्रिशुली ३बी जलविद्युत प्रकल्पातही मोठ्या संख्येने नागरिक अडकल्याची माहिती आहे. या प्रकल्पात अभियंते, अधिकारी आणि कामगार मिळून ११८ जण असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

महापुरानंतर आता नेपाळसमोर सार्वजनिक आरोग्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. सात दिवसांनंतर पूरग्रस्त भागांत दुर्गंधी वाढू लागली असून ढिगाऱ्यांमध्ये आणि दलदलीच्या ठिकाणी अडकलेले मृतदेह सडत आहेत. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबवणे, मृतदेह बाहेर काढणे आणि संभाव्य साथीच्या रोगाचा फैलाव रोखणे, अशी अनेक आव्हाने प्रशासनासमोर आहेत. महापुरातील जीवितहानीसोबतच आता रोगराईचा धोका वाढल्याने नेपाळ सरकारची चिंता आणखी वाढली आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 27, 2026
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.

Sep 21, 2026
इंडोनेशियात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक गायब; जावा समुद्रात शोधमोहीम सुरू

इंडोनेशियात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक गायब; जावा समुद्रात शोधमोहीम सुरू

इंडोनेशियातील जावा समुद्रात २४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ‘व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८’ जहाजाचा संपर्क तुटला असून बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 13, 2026
पूराने उद्ध्वस्त नेपाळ पुन्हा हादरले; आठ दिवसांत भूकंपाचे तीन मोठे धक्के

पूराने उद्ध्वस्त नेपाळ पुन्हा हादरले; आठ दिवसांत भूकंपाचे तीन मोठे धक्के

Nepal Earthquake: विनाशकारी पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळला रात्री पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी 5.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला

Sep 09, 2026