मंत्री विजय शाह यांच्या राजिनाम्याची मागणी!
नांदेड (Vijay Shah Resignation) : ऑपरेशन सिंदूरचा मुख्य चेहरा असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांच्या विषयी मध्यप्रदेशचे भाजपा मंत्री विजय शाह (BJP Minister Vijay Shah) यांनी अवमानजनक व्यक्तव्य केल्याप्रकरणी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थित व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार (Metropolitan President Abdul Sattar) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी 17 मे रोजी मंत्री विजय शाह यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन (Jode Maro Movement) करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मंत्री विजय शाह यांच्या राजिनाम्याची मागणी देखील करण्यात आली.
मंत्री विजय शाह यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध!
देशाचा अभिमान असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बदल मध्यप्रदेशचे भाजपा मंत्री विजय शाह हे अवमानकारक विधान केले, यावर मा. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील मंत्री विजय शाह यांचा राजिनामा भारतीय जनता पार्टी घेत नाही. हाच भाजपाचा खरा चेहरा आहे. अशी टिका यावेळी खा. रवींद्र चव्हाण यांनी केली. शनिवारी नवा मोंढा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर (Congress Committee Office) मंत्री विजय शाह यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
मंत्री विजय शाह यांच्या राजिनाम्याची मागणी!
यावेळी मंत्री विजय शाह यांच्या राजिनाम्याची (Resignation) मागणी देखील करण्यात आली. यावेळी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडसकर, राजेश पावडे, अनिल मोरे, अब्दुल गफार, बालाजी चव्हाण, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, श्रीनिवास मोरे, अजिज कुरेशी, मुन्ना अब्बास, मुन्तजिब, माधवराव पवळे, नसिम पठाण, ज्योती कदम, रफिक पठाण, दिपकसिंग हजुरीया, संजय वाघमारे, गगन यादव, अतुल पेदेवाड, पिंटू पाटील आलेगावकर, शेख मुख्तार, तुषार पोहरे, धनंजय उमरीकर, गणेश कोकाटे, प्रसेन्नजित वाघमारे, गौतम सिरसाट, गोविंद पाटील, आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
