परभणीच्या किन्होळा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
परभणी (Parbhani Gharkul Yojana) : घरकुलाच्या फाईल तयार करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती ८ हजार रुपये स्विकारले. लाच घेताना किन्होळा ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी आम्रपाली लक्ष्मणराव काकडे यांच्यावर परभणी लाचलुचपत विभागाने बुधवार २० ऑगस्ट रोजी कारवाई केली आहे. संबंधीताविरुध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
परभणी येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार देण्यात आली होती. तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर करण्यात आले आहे. (Parbhani Gharkul Yojana) घरकुलाचा हप्ता जमा झाला होता. घरकुलाचे काम सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे घेऊन तक्रारदार याने ग्रामविकास अधिकारी आम्रपाली काकडे यांच्याकडे विचारणा केली. यावेळी त्यांनी एका फाईलचे ५ हजार असे दोन फाईलचे १० हजार रुपये लागतील असे म्हणत लाच मागितली. पडताळणी कारवाई दरम्यान आम्रपाली काकडे यांनी तडजोडी अंती ८ हजार रुपये मागितले.
त्यानंतर २० ऑगस्टला आम्रपाली काकडे यांनी त्यांच्या राहत्या घरी कारेगाव रोड येथे पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून ८ हजार रुपये स्विकारले. लाचेच्या रक्कमेसह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Parbhani Gharkul Yojana) आरोपी लोकसेविकेच्या घराची झडती घेणे सुरु आहे. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक महेश पाटनकर, पोलिस निरीक्षक अलताफ मुलानी, मनिषा पवार, पोलिस अंमलदार रविंद्र भुमकर, सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, राम घुले, शेख जिब्राईल, नरवाडे, लहाडे यांच्या पथकाने केली.