Korchi News :- आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील अंकित कृषी केंद्रातील (Agricultural Centers) युरिया खताचे पीकअप वाहन छत्तीसगढ राज्यातील वासळी येथील व्यापार्याकडे घेऊन जात असताना कोरची तालुक्यातील कोहका येथील गावकर्यांनी पकडल्याची घटना आज ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.
पीकअप असून खुद्द कृषी केंद्राच्या मालकाचा मुलगा रूचित दिलीप बोधनकर पीकअप चालवित होता.
समक्ष गावकर्यांनी खताची प्रतीगोणी २७० रुपये देऊन घेऊन गेले
आधीच, कोरची तालुक्यात युरिया खताचा (Urea fertilizer) मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. कृषी केंद्रात जे युरिया खत आहे, त्या खताची गोणी ४०० ते ७०० रूपये दराने विक्री करीत आहेत अशी शेतकर्यांची ओरड आहे. पिकअप वाहनास अटकाव केल्यानंतर गावकर्यांनी कोरची येथील कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकार्यांना फोन केला. मोक्यावर कृषी अधिकारी सुनील जमकातन, अमोल डोंगरवार, आणि गुण नियंत्रक ईश्वर पाथोडे उपस्थित होते. पाथोडे यांनी सदर घटनेची तक्रार पोलीसात केली. नंतरच ते मोक्यावर आले. त्यामुळे बराच उशीर झाला. त्यामुळे गावकर्यांनी खताच्या गोण्या वाहना मधून खाली उतरविल्या. त्यांच्या समक्ष गावकर्यांनी खताची प्रतीगोणी २७० रुपये देऊन घेऊन गेले. त्या पीकअप मध्ये ७५ गोण्या होत्या. गावकर्यांना पुन्हा खत पाहिजे होता.
कृषी केंद्रधारकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही
त्यामुळे खत आणण्यासाठी पीकअप वैरागडला घेऊन गेले.एवढ्यात बेडगाव आणि कोरची येथील पोलीस अधिकारी मोक्यावर पोहोचले आणि गाडी चालक रूचित बोधनकर याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याप्रकरण विषयी गुण नियंत्रक पाथोडे यांना विचारणा केली असता, गावकर्यांनी खताच्या गोण्या विकत घेऊन गेले. तसे लेखी लिहून दिले. त्यामुळे वैरागड येथील कृषी केंद्रधारकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सदाराम नुरूटी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा नरडंगे, उपसरपंच ममता सहारे, पोलीस पाटील समुंद घाटघुमर, बेलगाव घाटचे सरपंच मदन कोल्हे, रतनलाल घाटघुमर, महेंदू घाटघुमर आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते