पंढरपूर तीर्थक्षेत्रासारखी रचना!
बार्शीटाकळी (Vitthal Rukmini Temple) : राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान अर्थात पती पंढरपूर तीर्थक्षेत्र नावाने प्रसिद्ध असलेल्या पिंजर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांच्या उपस्थितीत दहीहांडी महोत्सव (Dahi Handi Festival) व यात्रा महोत्सव (Travel Festival) पार पडला.
हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा दहीहंडी महोत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला!
बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर हे गाव आहे. या गावाला पिंजरा नदी आहे. देशातील असंख्य वारकऱ्यांचे (Warkari) श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर (Pilgrimage Pandharpur) येथील रचना जशाप्रकारे आहे. तशा प्रकारची चंद्रकोर नदी, भक्त पुंडलिकाची समाधी, गोपाळपूर, संत चोखामेळा महाराज, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलीचे मंदिरे या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी प्राचीन असे विठ्ठल रुक्मिणी चे देवालय (Vitthal Rukmini Temple) आहे. या ठिकाणची नैसर्गिक व भौगोलिक रचना प्रति पंढरपूर सारखी आहे. पूर्वीपासून असे म्हणतात की या ठिकाणी तीन वेळा वारी केली म्हणजे, पंढरपूर तीर्थक्षेत्राचे एक वेळा वारी केल्याचे पुण्य भक्तांना मिळते. अशा प्रकारची आख्यायिका आहे. दिनांक दहा व 11 जुलैला या ठिकाणी दहीहंडी महोत्सव व 11 जुलैला यात्रा भरते. दहीहंडी महोत्सव पार पडल्यानंतर, महाप्रसादाचे वितरण झाले. राज्यातील दूरवरून व जवळील अनेक गावातून आलेल्या भाविक भक्तांनी शांततेच्या व शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी हजारो भाविक भक्तांनी (Devout Devotees) दर्शनाचा दहीहंडी महोत्सवाचा व महाप्रसादाचा (Mahaprasad) लाभ घेतला आहे. विठ्ठल रुक्माई संस्थांनच्या वतीने व जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी सतत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. अशा प्रकारची माहिती प्रेम पाटील लहाने यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली.