7 ते 8 वारांनी घेतला जीव, 2 चिमुकल्यांचे संसार उद्ध्वस्त!
परभणी (Murder Case) : परभणीतील जिंतूर तालुक्यातील सोनापुर तांडा येथे कौटुंबिक वादातून घडलेली घटना सर्वांना हादरवून टाकणारी आहे. पत्नीवरच पतीने धारदार शस्त्राने 7 ते 8 वार करत निर्घृण खून केल्याची घटना २८ ऑगस्ट दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली आहे.
गावात आता “विद्याच्या खुनाचा आरोपी पतीला तात्काळ अटक करावी” अशी जोरदार मागणी!
मृत महिलेचे नाव विद्या विजय राठोड (वय ३२) असून ती मूळची सोनापुर तांडा येथील रहिवासी आहे. तिचा विवाह परभणीच्या वाघी (ता. जिंतूर) येथील विजय राठोड यांच्याशी झाला होता. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने विद्या माहेरी आली होती. मात्र २८ आगस्ट दुपारी साडेतीन च्या सुमारास तिच्या वडिलांच्या शेतातच पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. वादाच्या भरात विजय राठोड याने हातातील धारदार तीक्ष्ण हत्यारांने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर व हातावर जबर हल्ला केला. विद्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात भर पावसात नातेवाईकांचा आक्रोश उसळला. मृतकाला 2 लहान मुले असून आईच्या छत्रछायेशिवाय त्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. दरम्यान, घटनेनंतरही रुग्णालयात एकही पोलिस कर्मचारी (Police Personnel) वेळेत पोहोचला नाही, याबद्दल ग्रामस्थांत संताप पसरला आहे. गावात आता “विद्याच्या खुनाचा आरोपी पतीला तात्काळ अटक करावी” अशी जोरदार मागणी होत आहे.




