Manora :- तालुक्यातील वाईगौळ येथिल आश्रमशाळेत (Ashram school) आरक्षण कायद्यालाच बगल देत संस्था चालकांच्या मुलांना शिक्षक पदावर बसविल्याचे पराक्रम संस्थाचालकांनी केल्याचे मागासवर्गीय कक्ष, अमरावती यांनी बिंदूनामावली प्रस्ताव पडताळणी दरम्यान अधोरेखित केले आहे. माध्यमिक आश्रमशाळेत ‘विमुक्त जाती- अ’ या प्रवर्गात रिक्त जागा नसताना देखील दोन अतिरिक्त शिक्षक भरले आहे आणि त्यांची नियुक्ती नियमबाह्य (out of order) ठरविली आहे.
बिंदू नामावली धाब्यावर बसवून संस्था पदाधिकाऱ्यांच्या मुलांना नोकरीची खैरात
आश्रमशाळेत बऱ्याच प्रमाणात अनियमितता असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असून प्रशासक नियुक्तीचे दोन वेळा प्रस्ताव जिल्हा आणि प्रादेशिक कार्यालयाकडून पाठवूनदेखील अद्यापपर्यंत प्रशासकाची नियुक्ती केलेली नाही त्याकरिता ॲड.श्रीकृष्ण राठोड यांचे प्रयत्न उच्च स्तरावर सुरू आहे. प्राथमिक आश्रमशाळेत सुद्धा विजा ‘अ’ हा बिंदू यापूर्वी वापरला गेल्याने तिथे केलेली विजा ‘अ’ या प्रवर्गातील नियुक्ती, ही सुद्धा बेकायदेशीर ठरविण्याकरिता श्री. इंद्रजीत राठोड यांनी मावक, अमरावती यांचे कडे तक्रार अर्ज दाखल केला असून, मावक, अमरावती ने सहाय्यक संचालक, इमाव बहुजन कल्याण, वाशिम यांना सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्यास आणि नियमानुसार प्रस्ताव सादर करण्याकरिता आदेशित केले आहे. परंतु सहाय्यक संचालक स्तरावर वर्षानुवर्षे बरेच तक्रार अर्ज प्रलंबित असून त्यावर कार्यवाही होत नसल्याची नाराजी इंद्रजीत राठोड यांनी प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.
सहाय्यक आयुक्त, मागासवर्गीय कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांनी गतवर्षीच प्रादेशिक उपसंचालक, इमाव बहुजन कल्याण, अमरावती यांना पत्राद्वारे सदर संस्थेने आरक्षण कायद्याचे उल्लंघन करून नियुक्त केलेल्या कर्मचारी यांचेबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत आणि संस्थेला कुठल्याही प्रकारचे अनुदान वितरित करण्यात येऊ नये, असे स्पष्टपणे पत्राद्वारे कळविले असतानादेखील प्रादेशिक उपसंचालक यांनी याबाबत ठोस अशी नियमानुसार कार्यवाही केली नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे.