पवनी (Wainganga Bridge Accident) : मोटारसायकल आणि सायकलच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सिंदपुरी-पवनी राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर शनिवार, दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली. सुमित कुमार मंडल (५५) आणि सोनुकुमार रीसिदेवा (३०) व लीलाधर पचारे (५०), असे जखमींची नावे आहेत.
पंचभाई राईस मिलमध्ये काम करणारे बिहार येथील सुमित कुमार मंडल (५५) आणि सोनुकुमार रीसिदेवा (३०) हे दुचाकीवरून पवनीहून येनोळ्याकडे भरधाव जात होते. दरम्यान पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचा ताबा सुटून समोर सायकलवरून जात असलेल्या लीलाधर पचारे (५०, सिंदपुरी) यांना मागून जोरदार धडक बसली. या (Wainganga Bridge Accident) अपघातात तिघेही पुलावर कोसळून गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, पवनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बैनगंगा नदीच्या पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज (Wainganga Bridge Accident) अपघातांचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम न केल्यास जीवितहानी टाळता येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.