कारवाईचा धाक नावापुरता, रस्त्यावर अपघात–जनतेचे हाल…
दत्तात्रय भटकर
बार्शी टाकळी (BarshiTakli Road) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साडेचार कोटी रुपये खर्च करून केलेल्या (BarshiTakli Road) डांबरीकरण रस्त्याच्या कामाची मुदत संपण्यापूर्वीच वाट लागली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दिलेल्या इशारा नावापुरता ठरला असून सदर रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने जनतेचे व प्रवाशांचे कमालीचे हाल होत असल्याची विदारक परिस्थिती उघड झाली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा ते बार्शीटाकळी या तीन किलोमीटर अंतराच्या (BarshiTakli Road) रस्त्याच्या कामाचा करारनामा 13 ऑक्टोंबर 2023 ला झाल्यानंतर सदर कामाचे भूमिपूजन लोकप्रतिनिधीने केले होते. यावेळी सदर कामाची माहिती असलेले फलक पिंपळखुटा येथे लावले होते. सदरकामाची सुरुवात झाल्यानंतर माहितीचे फलक काढून देण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम करताना खोदकाम केल्यानंतर टाकलेल्या मुरूमावर पाणी टाकून दबाई करणे ,एटीएम न टाकता जीएसबी टाकली सदर जीएसबी कुमार दर्जाची होती.
त्यावर रोलिंग बरोबर न करता त्यावर खडीकरण तथा गिट्टीचे तीन ते चार थर टाकूनटीचे तीन ते चार थर टाकने आवश्यक व बंधनकारक असताना सदर कोट न करता मुरमाचे कामावर चार इंच हॉट मिक्स डांबरीकरण थर टाकायला पाहिजे होते परंतु तसे न होता दोन्हींचाच टाकण्यात आले. यामध्ये डांबरीकरणाचा कमी वापर केला असून सदर रस्त्यावर बीजी जी डांबरकरणाचा मोठा थर तसेच शासकीय इस्टिमेट प्रमाणे सदर काम दर्जेदार साहित्याचा वापर करून झाले नाही. सदर काम करताना या भागाचे शाखा अभियंता , उपविभागीय अभियंता, तसेच कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा सदर काम शासकीय इस्टिमेट प्रमाणे करून घेणे आवश्यक व बंधनकारक असताना तसेच झाले नाही. त्यामुळे सदर रस्त्याची मुदत संपण्याच्या अल्प कालावधीतच वाट लागली. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेली असल्याने रस्त्यावरून एकदा करणारे वाहने घसरत असल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत असल्याने जनतेचे कमालीचे हाल होत आहेत.
उपविभागीय अधिकारी आरडी नवलकर नवलकार यांनी दिनांक सात जुलै 2025 ला मंगलम कंपनी चे ठेकेदार राहुल सावजी यांना पत्र देऊन सदर कामाची मोका पाहणी केली असता डीबीएम अतिशय खराब झाले असून सात दिवसाच्या आत उपाययोजना करावी अन्यथा आपणावर करारनाम्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा कंत्राटदारांना पाठविलेल्या पत्रात केला असून याच्या प्रतिलिपी कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांना दिल्याचे नमूद केले आहे. यानंतर दिनांक 10 जुलैला पुन्हा दुसऱ्यांदा सदर रस्त्यावरील डीबीएम अतिशय खराब झाले असून सदर रस्ता कुठेही लेवल मध्ये आढळत नाही त्यावरCamber न काढल्यामुळे सर्वत्र पाणी साचत आहे त्यामुळे संपूर्ण रस्ता अतिशय खराब होत आहे.
सदर त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून सदर (BarshiTakli Road) रस्त्याची तात्काळ डांबरीकरणाची पूर्ण दुरुस्ती सात दिवसाच्या आत करण्यात यावी. काही गुंतागुंती निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच आपणा विरुद्ध करारनाम्या नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा कंत्राटदाराला दिलेल्या पत्रातून केला होता. परंतु कारवाईचा इशारा नावापुरता ठरला असून सदर अधिकाऱ्याने कंत्राटदाराला कारवाईचा धाक टाकून दुकानदारी तर केली नाही ना अशा प्रकारचे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे कामाची सखोल चौकशी करून तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.