शेकडो पदे रिक्त, कार्यरतांवर कामाचा ताण
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा : आरोग्य यंत्रणा अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे. पण, आरोग्य यंत्रणेतीलच आरोग्य सेविका, आरोग्य सेवक अशी महत्त्वाची शेकडो पदे रिक्त आहेत. – आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्यांवर कामाचा ताण निर्माण होतो. 5 आरोग्य यंत्रणेतील ही पदे कधी भरली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र महत्त्वाचे आहेत. प्रकृती बिघडल्यास ग्रामीण भागातील नागरिक सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र गाठतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील विविध पदेही भरलेली असणे आवश्यक ठरते. पण, वर्धा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतो. बरेचदा कर्मचारी कमी असल्याची ओरड होते. कार्यरत असलेल्यांचे वर्क लोड वाढते. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होतो.
: शासनाने रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी आयटकचे दिलीप उटाणे यांनी केली आहे.
■ शासनाद्वारे भरती प्रक्रिया सुरू आहे. लवकरच रिक्त पदे भरली जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर म्हणाले.
■ वर्धा जिल्ह्यात १३४ आरोग्य सेविका तर १०२ आरोग्य सेवकांचे पदे रिक्त आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. जिल्ह्यात ११ पदे पर्यवेक्षकांची रिक्त आहेत. ६ पदे आरोग्य सहाय्यक पुरुष व १४ पदे आरोग्य सहाय्यक महिला यांचे रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षक २००७ च्या आकृतीबंधानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १९ पदे मंजूर आहेत त्यापैकी २५ टक्के असे तीन पदे सरळ सेवेने भरणे अपेक्षित आहे. दोन पदे भरलेली असून एक पद रिक्त आहे. तसेच १६ पदे आरोग्य सहाय्यक स्त्री पुरुष या संवर्गातून पदोन्नतीने भरायचे आहेत. परंतु पदोन्नतीचे ११ पदे रिक्त असल्याची माहिती आहे.
■ आरोग्य सहाय्यक पुरुष ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक महिला वर्धा जिल्ह्यात ३ १ प्राथमिक आरोग्य केंद्रात १४ पदे रिक्त आहेत.




