देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Wardha Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून पूर्वतयारीदेखील सुरू झालेली आहे. वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल २५ इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी मिळण्याकरिता अर्ज पक्षाकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये तिकीटावरून जोरदार स्पर्धा रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तिकीट मिळण्यावरून काँग्रेसमध्ये घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील तीन 5 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. एक (Assembly Elections) विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडूनही दावे करण्यात येत आहेत. अमूक मतदारसंघ आम्हालाच मिळावा, अशी भूमिका घटक पक्षांतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यात काँग्रेसनेही सध्या चारही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. भविष्यात महाविकास आघाडीतील वाटाघाटीनंतर कोणता मतदारसंघ कोणाला सुटणार ही बाब स्पष्ट होईल, पण, सध्या तरी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे दावे, प्रतिदावे सुरू असून राजकीय वातावरण तापू लागले आहे.
त्यात वर्धा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने (Wardha Assembly Elections) विधानसभेच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यात चारही विधानसभा मतदारसंघांमधून तब्बल २५ इच्छुकांनी उमेदवारी मिळण्याकरिता पक्षाकडे अर्ज सादर केलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये तिकीटावरून चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात तिकीटावरून स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात इच्छुकांचे अर्ज आल्यानंतर काहींच्या पायाखालची वाळूच घसरल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.
चार विधानसभा मतदारसंघातून २५ इच्छुकांचे उमेदवारी मागण्याकरिता अर्ज
आर्वी विधानसभेकरिता शैलेश अग्रवाल, अनंत मोहोड, चंद्रशेखर जोरे, शैलेश निंबोळकर, स्वप्नील उर्फ बाळा जगताप, सोमराज तेलखेडे, लोहे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अर्चना भोमले, पंढरी कापसे, प्रवीण उपासे, धर्मपाल ताकसांडे, विजया धोटे यांनी अर्ज भरल्याची माहिती आहे.
सर्वाधिक ११ अर्ज वर्धा विधानसभा मतदारसंघात (Wardha Assembly Elections) सादर करण्यात आले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज थेट मुंबई प्रदेश कार्यालयात देण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा विधानसभेतून उमेदवारी मिळण्याकरिता सुधीर पांगुळ, राजेंद्र शर्मा, सचिन पावडे, शैलेश अग्रवाल, शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, पुरुषोत्तम टोणपे, शिरीष गोडे, मनोज चांदुरकर, अभ्यूदय मेघे, हेमलता मेघे, देवळी विधानसभा मतदारसंघात चारुलता टोकस रणजित कांबळे यांनी अर्ज केलेत.




